हर्षवर्धन पाटील  sakal
पुणे

नीरा भीमा चा २५०० दर जाहीर; हर्षवर्धन पाटील यांची घोषणा

कारखान्याच्या संचालक मंडळाची ऊस दरासंदर्भात बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

डॉ. संदेश शहा

इंदापूर/बावडा : शहाजीनगर ( ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२१-२२ या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन रु. २५०० प्लस दर देण्यात येईल,अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी शनिवार दि. २३ ऑक्टोबर रोजी केली.

कारखान्याच्या संचालक मंडळाची ऊस दरासंदर्भात बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रु. २५०० पेक्षा जास्त दर दिला जाईल असे श्री. पाटील व श्री. पवार यांनी संचालकमंडळाच्या वतीने जाहीर केले.

श्री. पाटील पुढे म्हणाले, चालू हंगामात कारखान्याने ७ लाख मे.टन ऊस गाळपाचा संकल्प केला असून इथेनॉलचे १ कोटी ६० लाख लिटर, सेंद्रिय खत बॅगेची २ लाख निर्मिती,१५ लाख घनमीटर बायोगॅस निर्मिती आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून ४ कोटी ५० लाख युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची देयरक्कम रु. ११९ प्रमाणे दिवाळीपूर्वी बँक खात्यात वर्ग केली जाईल. कामगारांना ८.३३ टक्के बोनस देण्यात येईल. कारखाना हा कार्य क्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांना वरदान ठरला असल्याचे शेवटी हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे,विलासराव वाघमोडे,उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के,दत्तू सवासे,प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे,संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ ,कमाल जमादार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT