पहिल्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेत १२३ विषयांना मंजुरी
पहिल्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेत १२३ विषयांना मंजुरी sakal
पुणे

इंदापूर : पहिल्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेत १२३ विषयांना मंजुरी

डॉ. संदेश शहा

इंदापूर : कोरोना महामारीचे निर्बंध सैल झाल्यानंतर इंदापूर प्रशासकीय भवन शेजारी उभारण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या आकर्षक वीरश्री मालोजीराजे भोसले भवन मधील छत्रपती शिवाजीराजे सभागृहात झालेल्या पहिल्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेत विक्रमी १२३ विषय सर्वानुमते मंजुर झाल्याची माहिती पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी दिली. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, विरोधी पक्ष नेता पोपट शिंदे,सर्व नगरसेवक ,नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर, इंदापूर नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गेले दीड वर्षापासून कोरोना महामारीचा फैलाव शहरात होऊ नये म्हणून नगरपरिषद नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन बद्ध प्रयत्न केल्याने सुरवातीस शहरात एकही रुग्ण नव्हता. मात्र शासनाने मुंबई, पुणे येथील नागरिकांना मूळ गावी परतण्यास परवानगी दिल्यानंतर शहरात या महामारीचा फैलाव झाला. मात्र परिस्थिती नियंत्रणात राहिली. मात्र या काळात मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पणकरून कामकाज सुरू करण्यात आले. ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन सभा झाल्याने सभेत उत्साह दिसून आला. मात्र सभेत सामाजिक अंतर पाळण्यात आले.

नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा यांनी शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यास सर्वांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने सर्व विषय मंजूर झाले. इंदापूर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीतील सभागृह अपुरे पडत होते मात्र नगराध्यक्षा सौ. शहा यांनी नुतन सुसज्ज सभागृहात ही सभा घेण्याचा निर्णय प्रशस्त ठरल्याचे सर्व मंजूर विषयावरून दिसून येते. सभेचे कामकाज सभाअधिक्षक गजानन पुंडे यांनी चालविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT