Cattles sakal
पुणे

इंदापूर : गुरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मागील तीन ते चार महिन्यांपासून जनावरे चोरीस गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर पोलीसांनी शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या माढा ( जि. सोलापूर ) येथील टोळीचा पर्दाफाश करून चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आणून ६ लाख ४० हजाररुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली.

इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत मागील तीन ते चार महिन्यांपासून जनावरे चोरीस गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.जी.पाटील व त्यांच्या पथकाने आरोपी टोप्या उर्फपिंटया आलेकर ( वय २९ वर्ष ) व त्याचे इतर तीन साथीदार ( सर्व जण रा. माढा जि. सोलापूर ) या टोळीला शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत वेगवेगळ्या गावातील शेळया, बोकड, जर्शी गाई,म्हशी अशी जनावरे चोरल्याची कबुलीदिली.यावेळी आरोपींकडून एक बोलेरो पिकअप किंमत अंदाजे ४ लाख, एक म्हैस किंमत अंदाजे ३५ हजार, दोन जर्शी गायी किंमत अंदाजे ९० हजार, इतर जनावरे विकून आलेले १५ हजार रुपये असा एकूण ६ लाख ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार तांबे व काझी, पोलीस हवालदार वाघ व शिंदे, पोलीस नाईक नगरे,कदम,कळसाईत , आटोळे, गायकवाड, पोलीस शिपाई सय्यद व राखुंडे या पथकाने हे गुन्हे उघडकीस आणले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी पोलीस निरीक्षक मुजावर व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीची भव्य मिरवणूक, विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT