Indapur Tahsildar Shrikant Patil Attack Case esakal
पुणे

Indapur Tahsildar Attack : इंदापूरच्या तहसीलदारांवर भररस्त्यात हल्ला; आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी

सात तासाच्या आत इंदापूर पोलिसांनी (Indapur Police) तीन आरोपींना अटक केले होते.

संतोष आटोळे

पकडलेल्या तीन आरोपींना आज इंदापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ला (Indapur Tahsildar Shrikant Patil Attack) प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर सात तासाच्या आत इंदापूर पोलिसांनी (Indapur Police) यापैकी तीन आरोपींना अटक केले होते. त्यांना आज शनिवार रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे तहसील कार्यालयात त्यांच्या ड्युटीवर शासकीय वाहन (क्रमांक MH 42 AX 1661) मधून चालक मल्हारी मखरे यांच्यासह जुना सोलापूर-पुणे हायवे (Solapur-Pune Highway) रोडवरून शंभर फुटी रोडकडे संविधान चौकातून जात असताना अचानक काही इसमांनी पांढ-या रंगाची विना नंबरची काळ्या काचा असलेली स्कार्पिओ गाडी रोडला आडवी लावली.

त्यानंतर त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने व लाल मिरची पावडर डोळ्यावर टाकून वाहनाच्या सर्व काचा फोडून दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात शिवाजी किसन एकाड (रा. बाव्रसमळा इंदापूर), विकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी ता. इंदापूर), पिन्या ऊर्फ प्रदीप कल्याण बागल, तेजस अनिल विर, माऊली ऊर्फ शुभम महादेव भोसेकर (तिघे रा. भाटनिमगाव ता. इंदापूर) व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यावरून सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र फिरवीत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे, शिवाजी राऊत, प्रकाश पवार, विवेकानंद राळेभात, सहायक फौजदार प्रकाश माने, पोलीस हवालदार काशीनाथ नगराळे, लखन साळवे, विनोद रासकर, अमित यादव, सचिन बोराटे, पोलिस नाईक विष्णू केमदारणे.

तसेच सलमान खान, पोलिस शिपाई विशाल चौधर, गणेश ढेरे, सुहास शेळके, विनोद काळे, लक्ष्मण सूर्यवंशी यांची वेगवेगळी पथके नेमून सदर गुन्ह्यातील आरोपी पिन्या ऊर्फ प्रदीप कल्याण बागल, तेजस अनिल वीर, शुभम महादेव भोसेकर (तिघे रा. भाटनिमगाव) यांना मोठ्या शिताफिने अटक केली. त्यानंतर पकडलेल्या तीन आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT