निमसाखरच्या बंधाऱ्याच्या भराव खचला
निमसाखरच्या बंधाऱ्याच्या भराव खचला Sakal
पुणे

इंदापूर : निमसाखरच्या बंधाऱ्याच्या भराव खचला

राजकुमार थाेरात

वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर) येथील नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव खचला असून नीरा नदीमधील पाणी खचलेल्या भराव्यातून वाहत आहे. तसेच बंधाऱ्यावरुन होणारी वाहतुकही बंद असून बंधाऱ्याच्या भरावाची कामस्वरुपी दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये निमसाखर गावच्या हद्दीमध्ये नीरा नदीवरती कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा आहे. पुणे व सोलापूर जिल्हातील नीरा नदी काठच्या गावांसाठी बंधारा वरदान ठरला आहे. इंदापूर तालुक्यातील निमसाखर, निरवांगी, रणगाव, बाेंद्रेवस्ती, कारंडेवस्ती व माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ, बांगार्डे, मोरेवस्ती, चव्हाणवाडी परीसरातील शेतकऱ्यांसाठी बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होत असतो.

गेल्या अनेक वर्षापासून बंधाऱ्याच्या निमसाखर बाजूचा भराव खचत चालला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी ओढ्यामार्ग नीरा नदीमध्ये अचानक पाणी आल्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली. बंधाऱ्याला ढापे बसविले असल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी बंधाऱ्याच्या बाजूच्या भरावाने गेल्याने निमसाखर बाजूचा बंधारा खचला आहे. गेल्या आठ दिवसापासून बंधाऱ्यातील पाणी खचलेल्या बाजूनेे नीरा नदीमध्ये वाहून जात आहे.तसेच बंधाऱ्याचा भराव निमसाखरच्या बाजुने खचल्यामुळे माळशिरस व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची ये-जा बंद झाली आहे. बंधाऱ्याची कायमस्वरुपी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बंधाऱ्याच्या भरावाची तातडीने दुरुस्ती करणार- पवार

यासंदर्भात निमगाव -केतकी पाटबंधारे उपविभागाचे साहय्यक अभियंता अश्‍विन पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या बंधाऱ्यामध्ये जास्त पाणी असून खचलेल्या भराव्यातून वेगाने पाणी वाहत आहे. पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर तातडीने बंधाऱ्याच्या भरावाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येणार असून कायमस्वरुपी दुरुस्ती उन्हाळ्यामध्ये करण्यात येईल.

तातडीने दुरुस्ती करावी...

यांसदर्भात निमसाखर मधील शेतकरी सचिन रणवरे यांनी सांगितले की, निमसाखरचा कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. गेल्या अनेक वर्षापासून बंधाऱ्याचा भराव खचत चालला आहे. चालू वर्षी अवकाळी पावसामुळे पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये बंधाऱ्यामध्ये चांगला पाणी साठा असल्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT