corona.jpg 
पुणे

कोरोना संकटामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 'या' योद्धांचा होणार गौरव 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात आपात्कालीन परिस्थितीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील महावितरणचे अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुणे प्रादेशिक कार्यालयस्तरावर येत्या स्वातंत्र्यदिनी विशेष गौरव करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपाययोजना सुरु आहे. लॉकडाऊनच्या कालावधीपासून रुग्णालयांसह विविध विभागांची महत्वाची कार्यालये, इतर अत्यावश्‍यक सेवा तसेच घरून काम (वर्क फ्रॉम होम) करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 24 तास सुरळीत वीजपुरवठा देण्याचे कर्तव्य महावितरणचे अभियंता व तांत्रिक कर्मचारी बजावत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यावर तसेच अवकाळी वादळी पाऊस व "निसर्ग' चक्रीवादळाचा तडाखा आदींमुळे वीजयंत्रणेची मोठी हानी झाली तरी कमीतकमी वेळेमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम कर्मचारी करीत आहेत. 

संसर्गाचा धोका टाळून किंवा झाल्यास त्याचा यशस्वी मुकाबला करून तसेट कोरोना संकटामुळे अनेक मर्यादा असताना अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कामगिरीची दखल घेऊन पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुणे प्रादेशिक कार्यालयस्तरावर येत्या स्वातंत्र्यदिनी ( 15 ऑगस्ट ) मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

यासाठी आठ मंडल कार्यालय अंतर्गत प्रत्येकी एक शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचारी निवडण्यात येणार आहे. त्यासाठी रास्तापेठ, गणेशखिंड, पुणे ग्रामीण, बारामती, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली मंडल कार्यालयांकडून अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची या गौरवासाठी निवड करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT