India-Post
India-Post 
पुणे

Video : 'भारतीय टपाल बँक आपल्या दारी'; पुणेकर घरबसल्या काढताहेत पैसे!

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता : 'टपाल खाते आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या खात्यातील पैसे घरी काढू शकणार आहेत, अशी सुविधा सिंहगड रस्ता येथील टपाल कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे.

आपुलकी पुणेच्या सहकार्याने हिंगणे येथील टपाल कर्मचाऱ्यांनी नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असताना नागरिकांनी बाहेर जाऊ नये तसेच त्यांना एटीएमच्या रांगेत  उभे राहावे लागू नये यासाठी ही सुविधा असल्याचे टपाल विभागाच्या वतीने उपलब्ध केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यासाठी हिंगणे  येथील टपाल कार्यालयातील महेंद्र कुलकर्णी, सिद्धार्थ खामकर तसेच विभागीय समन्वयक राजेश बोकील यांनी सहकार्य केले सन सिटी, सुंदर सहवास, सेनोरिटा ग्रीनस आधी सोसायट्यांमधील नागरिकांना त्यांच्या सोसायटीच्या आवारातच रोख रक्कम काढून मिळाली. हे करत असताना सोशल डिस्टन सिंग पाळणे तसेच सॅनिटायझेशन इत्यादी सर्व नियमांची खबरदारी घेण्यात आली. यात आपुलकी पुणेचे समीर रुपदे यांनी सहकार्य केले.

आधार बायोमेट्रिक आणि मोबाईलवर आलेल्या ओटीपीच्या साहाय्याने नागरिकांना आपल्यात बँक खात्यातून पैसे काढता येणार आहे. त्यासाठी टपाल खात्याच्या वतीने अत्यावश्यक साधनसामुग्री उपलब्ध केलेली आहे. या सुविधेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत या सोबतच जनधन योजना निवृत्तीवेतन इत्यादी खात्यातील पैसे देखील या माध्यमातून काढता येणार आहेत.

ठराविक वेळेत बाहेर जाण्यास परवानगी आहे. त्यामुळे एटीएमला रांगेत उभे राहावे लागते तसेच तेथे गरज देखील होते धोका या सुविधेमुळे टाळता येतो सोसायटी आवारातच रोख रक्कम आपल्या खात्यातून काढता येत असल्याने हे सोयीचे आहे.

- भूषण कुलकर्णी 

यासाठी आधार कार्ड तसेच खाते धारकाचे बायोमेट्रिक लागणार आहे टपाल कार्यालयाचे कर्मचारी प्रत्येक सोसायटी स्तरावर जाऊन नागरिकांना त्यांच्या खात्यातून पैसे रोख रक्कम स्वरूपात काढून देणार आहे.

- चंद्रकांत भोर, सहाय्यक अधीक्षक, टपाल मुख्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT