पुणे : क्रिकेट सामन्यातील पाकविरूद्धच्या रोमांचक विजयानंतर शहरात जागोजागी धुमधडाक्यात विजयोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी दुपारपासूनच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याने प्रेक्षकांसह जणू संपूर्ण शहरावरच भुरळ घातली होती. दिवसभर शांत असलेल्या रस्त्यांवर संध्याकाळी विजयाचे फटाके फोडण्यात आले. तर काही ठिकाणी मंडळांनी गाणी वाजवत आनंदोत्सव साजरा केला.
पाकिस्तान विरुद्धच्या रोमहर्षक क्रिकेट सामन्यातील विजयानंतर भारतीयांची दिवाळी अधिकच गोड झाली आहे. रविवारच्या भाकड दिवशी जणू आनंदाचा पाडवाच साजरा करण्यात आला. विराट कोहलीने ‘नो बॉल’ ला मारलेल्या षटकाराची चर्चा शहरातील चौकाचौकात पाहायला मिळाली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्यापासून ते नामदार गोपाळकृष्ण गोखले चौकापर्यंत तिरंग्यासह ‘बाईक रॅली’काढल्याचे पाहायला मिळाले. फटाक्यांच्या आतषबाजीबरोबरच गाण्यावर ठेका धरलेल्या तरूणाईने आजच दिवाळी साजरी केली. मुख्य शहरासह उपनगरातही काही ठिकाणी एकत्र जमत तरूणाईने ‘टीम इंडिया’च्या विजयाचा जयघोष केला.
नो बॉल ट्रेंडींगमध्ये...
ट्वीटरसह विविध समाजमाध्यमांवर क्रिकेट सामन्यानंतर नो बॉल ट्रेंडींगमध्ये आला. विराट कोहलीने ‘नो बॉल’वर मारलेल्या षटकाराची स्तुती आणि पाकिस्तान संबंधीचे मीम्सही पाहायला मिळाले. विराटच्या षटकाराने भारतवासियांना दिवाळीची सर्वोत्तम भेट मिळाल्याचे चाहत्यांनी ट्वीट केले आहे. ‘काय मॅच, काय विराट, काय विजय’ एकदम ओक्के मंदी, भारताची विराट खेळी, अशा संदेशांचा समाजमाध्यमांवर जोरदार पाऊस पडला...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.