पुणे

भारत करणार जगाचे नेतृत्व; शास्त्रज्ञ प्रा. तरुण सौरदीप यांची माहिती 

सकाळवृत्तसेवा

पुणे - आज अस्तित्वात असलेल्या ब्रह्मांडाबद्दल आपल्याकडे पुरेशी माहिती आहे. पण, महाविस्फोटानंतर (बिग बॅंग) निर्माण झालेले प्रारंभीचे ब्रह्मांड कसे होते, त्यातून आकाशगंगा, डार्क मॅटर आदींची निर्मिती कशी झाली, याबद्दल आपण आजही अनभिज्ञ आहोत. प्रारंभीच्या ब्रह्मांडाचा कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंडने अभ्यास करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी "सीएमबी-भारत' ही मोहीम आखली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत जगाचे नेतृत्व करेल, असे प्रतिपादन भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. तरुण सौरदीप यांनी केले. 

आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संस्थेत (आयुका) विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या "ब्रह्मांडाच्या स्वरूपाचा उलगडा' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ब्रह्मांडाचे आजचे स्वरूप, वैश्‍विक स्थिरांक, कोल्ड डार्क मॅटर आदी विषयांचा आढावा त्यांनी घेतला. 

प्रा. सौरदीप म्हणाले, ""विश्वातील 95 टक्के पदार्थ, सतत विस्तारत जाणारे ब्रह्मांड, प्राचीन गुरुत्वीय लहरी याबद्दल आपण आजही अनभिज्ञ आहोत. यासंबंधीची माहिती सुरुवातीच्या ब्रह्मांडीय घटनांतून, त्यांच्या स्वरूपातून मिळेल. त्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी ही मोहीम आखली आहे.'' आयुकाचे संचालक प्रा. शोमक राय चौधरी, प्रा. सुहृद मोरे आदी उपस्थित होते. 

अशी आहे मोहीम 
- ब्रह्मांडीय "मायक्रोव्हेव'चा अभ्यास करण्यासाठी जगातील पहिली मोहीम 
- पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरवर असलेल्या "एल-2' बिंदूवर उपग्रह स्थिरावणार 
- "सीएमबी-भारत'मधील पेलोडचे वजन दोन टन 
- "जीएसएलव्ही मार्क : 3' अग्निबाणाचे प्रक्षेपण शक्‍य 

मोहिमेचे फायदे 
- क्वांटम ग्राव्हिटीद्वारे सुरुवातीच्या ब्रह्मांडाची निरीक्षणे होणार 
- डार्क मॅटर, दृश्‍य ब्रह्मांडातील बेरिऑन्स, न्यूट्रिनो फिजिक्‍सच्या निरीक्षणासाठी मदत 
- प्राचीन आणि सुरुवातीच्या ब्रह्मांडातील माहिती मिळणार 

देशाला मूलभूत विज्ञानात योगदान देण्याची सुवर्णसंधी "सीएमबी-भारत' मोहिमेद्वारे निर्माण झाली आहे. जगभरातील वैज्ञानिकांच्याही मोहिमेकडून अपेक्षा उंचाविल्या आहेत. 
- प्रा. तरुण सौरदीप 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal Election : काँग्रेसची मते वाढली, भाजपचा हिट रेशो वाढला; महापालिकेचं राजकीय गणित उघड

Latest Marathi News Live Update : चांदीचा आजचा भाव 3 लाख 5 हजार रुपये प्रति किलो

Gastrointestinal Cancer : वारंवार पोट दुखतंय? मग, याकडे अजिबात दुर्लक्ष नको; असू शकते कॅन्सरची सुरुवात...

Sugarcane Trolley Overturned : वाणेवाडीत ट्रॉलीभर ऊस अंगावर पडूनही बाप-लेक सुखरूप

Nashik Farmers Protest : वनहक्कासाठी आदिवासींचा एल्गार; नाशिक-गुजरात महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ठप्प!

SCROLL FOR NEXT