Sweden sakal
पुणे

नमस्ते स्टॉकहोम’ : भारतीय संस्कृतीचा स्वीडनमध्येही जल्लोष !

स्विडीश नागरिकही या महोत्सवात आवर्जुन सहभागी झाले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रंगीबेरंगी ओढण्यांच्या कलात्मक सजावटीने साकारलेलं प्रवेशद्वार, ओंकाराच्या शांत आर्जवात सुरू असलेला योगाभ्यास, भारतीय खाद्य पदार्थांच्या विक्रीचे स्टॉल्स आणि अप्रतिम कलाकुसरीने सजवलेल्या प्रशस्त रंगमंचावर भारतातील विभिन्न प्रांतांच्या एकाहून एक सरस कलागुणांच प्रदर्शन.... एक छोटा भारत साकारला तो ‘नमस्ते स्टॉकहोम महोत्सवात’ !

स्वीडन मधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रॉयल गार्डनमध्ये ‘नमस्ते स्टॉकहोम’ हा महोत्सव भारतीय दूतावास आणि ‘इंडिया अनलिमिटेड’ने नुकताच आयोजित केला. कोरोनामुळे दोन वर्षांनी हा महोत्सव झाला. भारतीय राजदूत तन्मय लाल आणि स्थानिक भारतीय कंपन्यांनीही त्यासाठी मोलाचे सहकार्य केले. हजारोंचा प्रतिसाद या महोत्सवाला मिळाला. स्विडीश नागरिकही या महोत्सवात आवर्जुन सहभागी झाले आणि त्याचा आनंद लुटला.

आर्ट ऑफ लिव्हिंग, इशा फाऊंडेशन आणि शांम्भला योगशाळा यांच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या योगाभ्यासाच्या वर्गातून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विविध फूड स्टॉल्सकडे नागरिकांची पावले वळली. त्यात स्टॉकहोम मधील खास भारतीय उपहारगृहे अस्सल देशी खाद्यपदार्थांसह सहभागी झाली होती. याला जोडूनच छोट्या मुलांच्या कल्पक खेळांचे दालन, सारंग हस्तकला व निर्मिती केंद्राचं भारतीय कलाकुसर दाखविणारं इशा फौंडेशनचे प्रदर्शन पाहुण्यांच्या गर्दी खेचत होत. ‘आकृती आर्ट’च्या जलपा पटेल यांनी केलेली रंगमंचाची आकर्षक सजावट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

येथील सरस्वती कलाकेंद्राच्या चमूने गणेशवंदनेने सांस्कृतिक उत्सवाचा प्रारंभ केला. त्यानंतर भारतीय राजदूत तन्मय लाल यांनी सपत्नीक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन केले. सादर झालेल्या कार्यक्रमांतन ’भारतीय एकता-अस्मिता’ याच दर्शन घडले. ‘भारतीय स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष’ हा अनेक सादरीकरणाचा मुख्य गाभा होता. विशेष म्हणजे, ‘महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम’च्या चमूने सादर केलेल्या ‘महाराष्ट्राची लोकनृत्यकला’ आणि आणि लेझीम, लावणी, जोगव्याच्या ठेक्यावर कडाडून टाळ्या-शिट्या वाजवत कौतुकाचा पाऊस पाडला.

सुशील समूहाच्या बॉलिवूड भांगडावर प्रेक्षक धुंद थिरकले तर अँलेन समूहाच्या महोत्सव सादरीकरणावर ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत त्यांनी ताल धरला. संस्कृती समूहाच्या अनोखा भारत या सादरीकरणाला ‘वंदे मातरम’, ‘भारत माता कि जय’ अशा घोषणांनी प्रेरक दाद दिली मिळाली. पावसाचा जोर वाढल्यावरही, छत्र्यांमध्ये उभे राहत उपस्थितांनी सादरीकरणाला दाद दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अभिनय सरकटेंच्या बॉलीवूड डिजेवर प्रेक्षक दणाणून नाचले. येथील भारतीयांसाठी हा महोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी होतीच पण स्वीडिश लोकांसाठीही भारत जाणून घेण्याची व अनुभवण्याची संधी मिळाली, अशा प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ठाकरेंचं चॅलेंज फडणवीसांनी स्वीकारलं; म्हणाले, एक लाख रुपये जिंकलो!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे, दौड, काष्टी रुळाचे काम होणार; नागपूर-पुणे मार्गावरील गाड्या झाल्या रद्द..

Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांचा परदेशात डंका! नेदरलँड अन् जर्मनीसाठी पहिली ३० टनांची खेप रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : शहर पर्यटन वाढीला आडकाठी! नियोजित पर्यटन धोरण वर्षभरापासून रखडले

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

SCROLL FOR NEXT