Dr. Vaibhavi Najhare
Dr. Vaibhavi Najhare sakal
पुणे

Vaibhavi Najhare : भारतीय मराठी मुलगी युक्रेन-रशिया युद्धात युक्रेन सैनिकांची करतेय सेवा

नितीन बिबवे

युक्रेन-रशिया युद्ध सुरू होऊन एक वर्ष झाले आहे, पुण्यातील बिबवेवाडी मध्ये जन्मलेली डॉ. वैभवी नाझरे मागील एक वर्षापासून युक्रेनच्या जखमी सैनिकांची शुश्रूषा करीत आहे.

बिबवेवाडी - युक्रेन-रशिया युद्ध सुरू होऊन एक वर्ष झाले आहे, पुण्यातील बिबवेवाडी मध्ये जन्मलेली डॉ. वैभवी नाझरे मागील एक वर्षापासून युक्रेनच्या जखमी सैनिकांची शुश्रूषा करीत आहे. बिबवेवाडीत दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज चालविणारे विनायक नाझरे व कुमुदिनी नाझरे यांची कन्या.

लहानपणापासून तिची डॉक्टर होण्याची इच्छा होती. फर्ग्युसन कॉलेजला बारावीसाठी प्रवेश मिळाला. सीईटी नंतर तिला निगडीच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. पण तिला ससून किंवा आर्मी कॉलेज मध्येच प्रवेश हवा होता. तिने तो प्रवेश नाकारला. तिने युक्रेनमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी अर्ज केला. ऑक्टोबर 2017 ला युक्रेनच्या राजधानी किव्हमध्ये वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश मिळाला. तिचा काँलेज मित्र डॉ. टीमोफ़ि व वैभवी यांचे पुण्यात आळंदी येथे जुलै २०१९ मध्ये लग्न झाले.

वैभवीचे शिक्षण व डॉ. टीममोफ़ि यांची प्रॅक्टिस यूक्रेन मध्ये सुरू होती. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, युद्ध सुरू झाले, परिस्थिति अवघड झाली होती. दरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मधून परत आणण्याचे धोरण भारत सरकारने यशस्वीपणे राबवले.

वैभवीच्या आईवडिलांना जावईसह तिने भारतात यावे असे वाटू लागले. त्यांनी प्रयत्न सुरू केले. पण वैभवीने भारतात येण्यास नकार दिला. देश संकटात असताना टीमोफ़ि यांनी देश सोडण्यास नकार दिला. मात्र त्यांनी वैभवीला भारतात परत जाण्यास व युद्ध संपल्यावर परत येण्यास सांगितले होते. पण वैभवीने आपल्या पतीला ही भारतात जाण्यासाठी नकार दिला. ती यूक्रेन देशाची नागरिक होती. पण भारतात परत येण्यास तिला कोणतीच अडचण नव्हती. दरम्यान युक्रेन सरकारने १८ ते ६० वर्षाच्या नागरिकांना देश सोडण्यास बंदी घातली.

सर्व भारतीय विद्यार्थी आज भारतात परत आले आहेत. आता युक्रेन मध्ये एकमेव भारतीय विद्यार्थिनी आहे, ती म्हणजे वैभवी. देशसेवेसाठी टीम व वैभवीने स्वत:ला झोकून दिलेले आहे. दोघेही जखमी सैनिकांची शुश्रूषा करीत आहेत. सर्जरी करीत आहेत.

सायरनचे आवाज, विमानांचे, बॉम्बचे आवाज ऐकत, महागाईशी टक्कर देत, आपला संसार सांभाळून देशसेवेसाठी १८-१८ तास काम करीत आहेत. त्यांच्या निवासस्थानजवळ बॉम्ब पडत आहेत. जीव मुठीत धरून बेडरपणे वैभवी जखमी सैनिकांची सेवा करीत आहे.

युक्रेन सरकारने तिच्या शौर्याबद्दल २८ फेब्रुवारी रोजी बेस्ट सर्जनचा किताब वैभवीला दिला असून तिचा सन्मान केला आहे.

आपल्या भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, भारताची एक सुकन्या युक्रेन देशाची सून बनून, आपले सासर हेच आपले घर मानते व भारतीय परंपरेचे, भारतीय संस्कारांचे जतन करत, आपला युक्रेन देश संकटात असताना, आपला संसार सांभाळत स्वत:चे संपूर्ण योगदान देते ही भारतीयांसाठी व भारतीय महिलांसाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट असल्याची भावना विनायक नाझरे व्यक्त करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियाचे शेअर्स वधारले, नेस्लेचा शेअर घसरला

Star Sports Hits Back Rohit Sharma : 'हिटमॅन' रोहित शर्माच्या आरोपांवर स्टार स्पोर्ट्सने केला पलटवार; म्हणाले...

Gold Rate: सोने-चांदी तोडणार सर्व रिकॉर्ड? इराण ठरणार कारणीभूत; जाणून घ्या भाव

Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT