Savitribai-Phule-Pune-University
Savitribai-Phule-Pune-University 
पुणे

विद्यापीठात होणार भारतीय मानवशास्त्र परिषद

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानवशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र मानवविज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने "भारतीय मानवशास्त्र परिषदे'चे येत्या 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद विद्यापीठाच्या ज्ञानेश्‍वर सभागृहात होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. शौनक कुलकर्णी यांनी दिली.

या परिषदेचे उद्‌घाटन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते होणार असून, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित राहणार आहेत. "विकसनशील भारतासाठी मानवशास्त्र : धोरण, नियोजन आणि अंमलबजावणी' ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. जीवशास्त्रीय मानवशास्त्र, सामाजिक-सांस्कृतिक मानवशास्त्र, पुरातत्त्वीय आणि भाषिक मानवशास्त्र; तसेच या शाखांच्या विविध उपशाखांच्या माध्यमातून धोरण नियोजन आणि अंमलबजावणी यावर परिषदेत ऊहापोह होणार आहे. या संकल्पनेवर आधारित भारतातील प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञांची गोलमेज परिषद पहिल्या दिवशी होईल.

मानवशास्त्राच्या आठ उपशाखांवर समांतर चर्चासत्रे होणार असून, त्यामध्ये एकूण 200हून अधिक शोधनिबंध सादर होणार आहेत.
यात देश-विदेशांतील जवळपास तीनशे मानवशास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये रशिया, पोलंड, फिनलंड, थायलंड, अफगाणिस्तान येथील अभ्यासकांचाही समावेश आहे. परिषदेचा समारोप 23 फेब्रुवारीला विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या उपस्थित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT