पुणे

इंद्रायणी, सोलापूर एक्‍सप्रेसमध्ये प्रवाशांची आसन क्षमता वाढली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुंबई- पुणे इंद्रायणी एक्‍स्प्रेस आणि पुणे- सोलापूर एक्‍स्प्रेसचे रूपांतर 'लिंक हाफमन बुश्‍च'मध्ये (एलएचबी) झाल्यामुळे दिव्यांगांसह प्रवासी क्षमतेत वाढ झाली असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. एक फेब्रुवारीपासून या दोन्ही गाड्यांचे रूपांतर 'एलएचबी'मध्ये झाले आहे.

इंद्रायणी एक्‍सप्रेस (क्र. 22105- 22106) आणि पुणे- सोलापूर एक्‍स्प्रेस (क्र. 12169, 12170) या दोन्ही गाड्या (एलएचबी) मध्ये रूपांतरीत झाल्यामुळे प्रवाशांसाठीच्या आसन क्षमतेत वाढ झाली आहे तसेच खिडक्‍याही रूंद झाल्या आहेत.

शिवाजीनगरमध्ये जाहिरात फलकासाठी आणखी एका वृक्षाचा बळी

आसन व्यवस्थाही रूंद झाली असून प्रवाशांना रेल्वे डब्यात सहजपणे वावरता येते. या दोन्ही गाड्यामध्ये या पूर्वी इंटिग्रल कोच फॅक्‍टरी (आयसीएफ) पद्धतीची व्यवस्था होती. त्यात आता बदल झाला आहे. इंद्रायणीमध्ये जनरेटर व्हॅनची पुर्नरचना करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील प्रवासी आसन क्षमता 36 झाली असून त्यातील 30 आसने प्रवाशांसाठी सहा आसने दिव्यांगांसाठी आहेत. तसेच या दोन्ही गाड्यांमधील या पूर्वीची आसन क्षमता 108 आसनांची होती. 'एलएचबी'मध्ये त्या रूपांतरीत झाल्यामुळे प्रवासी क्षमता 120 झाली आहे, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. 

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT