Industry Minister Subhash Desai assured that problems of electricity and water bills of entrepreneurs will solve
Industry Minister Subhash Desai assured that problems of electricity and water bills of entrepreneurs will solve 
पुणे

उद्योजकांच्या वीज, पाणी बील विषयक अडचणी सोडवू; उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य शासनाच्या औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना लॉकडाऊन काळात कारखाने बंद असतानाही वीज आणि पाणी वापराची जी बिले (मिनिमम चार्जेस बिल) आली आहेत. ती माफ करण्यासाठी सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करेल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळा'च्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना आलेल्या वीज, पाणी वापराबाबात येणारी मिनिमम चार्जेस ही बिले माफ करावी. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळेल, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. सरकारच्या समोर हा प्रस्ताव असून बिल माफ करण्यासाठी सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करेल, असे आश्वासन देसाई यांनी यावेळी दिले.

VIDEO - पुण्यात हॉस्पिटलमध्ये बेडसाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ

लॉकडाऊन काळात उद्योजकांचे झालेले नुकसान पाहता बँकांनी पुढील काळात त्यांना सुलभ कर्ज द्यावे, असे सरकारचे निर्देश असतानाही बँका याबाबतीत चाल ढकल करीत असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने देसाई यांच्या निदर्शनास आणले. त्यावर नव्या परिस्थितीत उद्योग उभारणी करण्यासाठी सरकार बँकांना योग्य ते निर्देश देईल, असे आश्वासन देसाई यांनी दिले. मंडळ शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल, उद्योजक भाऊसाहेब जंजिरे उपस्थित होते.

पोलिस काढणार रेखाचित्रातून आरोपींचा माग; पाच दिवसांच्या अभ्यासक्रमाची सुरुवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT