पुणे

दौंड नदीपात्रात सापडलेल्या मूर्तीचा झाला उलगडा

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरातील भीमा नदी पात्रात सापडलेली महादेवाच्या मुखाची भग्न मूर्ती ही जिरेगाव (ता. दौंड) येथील असल्याची माहिती पुढे आली आहे. १९ महिन्यांपूर्वी सदर मूर्ती नदी पात्रात विसर्जित करण्यात आली होती.

दौंड येथील भीमा नदी पात्रातील ब्रिटीशकालीन दगडी रेल्वे पुलाशेजारी नवीन रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. खोदकाम सुरू असताना २६ डिसेंबर रोजी एक अर्धनारीनटेश्वर महादेवाचे फक्त मुख असलेली मूर्ती सापडली होती. सिमेंट कॉंक्रिटच्या या मूर्तीच्या मुखाची उंची ५ फूट ७ इंच असून रूंदी २ फूट ९ इंच आहे. मूर्ती भग्न असली तरी नदी पात्रात सापडल्याने त्याची पूजा सुरू करण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान वृत्तपत्रे व समाजमाध्यमांमध्ये आलेल्या सचित्र बातम्यांनंतर सदर मूर्ती दौंड शहरापासून कुरकुंभ मार्गे १४ किलोमीटर अंतरावर असणार्या जिरेगाव येथील असल्याची माहिती पुढे आली. तेथील श्री दत्त मंदिराच्यावर सोळा वर्षांपूर्वी ही मूर्ती बसविण्यात आली होती. सदर मंदिराच्या शिखराचे काम करावयाचे असल्याने महादेवाच्या मुखाची ही मूर्ती काढून ठेवण्यात आली होती. परंतु अशी मूर्ती मंदिरात जमिनीवर ठेवणे योग्य नसल्याचा विचार करून १९ महिन्यांपूर्वी ही मूर्ती दौंड मधील नदीत विसर्जित केली होती, अशी माहिती जिरेगाव ग्रामपंचायतचे सदस्य सोनबा मचाले यांनी दिली.

सरपंच भरत खोमणे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. नदी पात्रात ही भग्न मूर्ती सापडल्यापासून भाविक त्याची पूजा करीत असून काही उत्साही लोकांनी पाच लिटर दुधाने मूर्तीस दुग्धाभिषेक देखील केला आहे. 

मंदिराच्या शिखराचे काम करायचे असल्याने महादेवाची मूर्ती काढून ठेवली होती. परंतु ती भग्न झाल्याने विधीपूर्वक पूजा करून ट्रॅक्टर - ट्रेलर मधून आणत दौंड येथे ग्रामस्थांसह मी मूर्तीचे विसर्जन केले होते. -महादेव गाढवे (पोलिस पाटील-  जिरेगाव)

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT