पुणे

दारु नको...दूध पिऊ या...बारामतीत पोलिसांचा अभिनव उपक्रम

मिलिंद संगई

बारामती : येथील शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी यंदा नववर्षाच्या स्वागतानिमित्त दारु नको दूध पिऊ या...अशा अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. 

दरवर्षी नववर्षाच्या संध्येला रात्री दारु पिऊन अनेक ठिकाणी लोक गोंधळ घालतात, याचा उपद्रव समाजाला होतो, काही ठिकाणी भांडणे व मारामा-याचे प्रसंगही उदभवतात, त्यामुळे दारुचे सेवन टाळून दुधाचे सेवन करत नवीन प्रथा पाडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. 

अनेकदा नकळतपणे दारुचे सेवन केल्यानंतर किरकोळ कारणावरुन भांडणे होतात, नशेमध्ये लोकांना आपण काय करतो हे समजत नाही, त्यातून गुन्हे दाखल होतात व अनेकांना नंतर विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो. या बाबी टाळण्याच्या उद्देशाने यंदा पोलिस विभागाने दारु टाळून दुधाचे सेवन करण्याबाबत पुढाकार घेतल्याचे नामदेव शिंदे यांनी सांगितले. 

युवकांसमोर दारुचा आदर्श निर्माण होऊ नये, त्यांना करिअर करताना प्रेरणादायी विचार मनात यावेत, नववर्ष स्वागताच्या नावाखाली घातला जाणारा धिंगाणा टाळून त्याचा समाजाला होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी यंदा या बाबत पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी अशा उपक्रमासाठी पुढाकार घेण्याची ही बारामतीतील पहिलीच वेळ आहे. नववर्षाचे स्वागत चांगल्या पध्दतीने व्हावे, कोणत्याही प्रकारची कटुता नवीन वर्षाला सामोरे जाताना मनात निर्माण होऊ नये या साठी अशा उपक्रमाची गरज होती, त्या नुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला असून गावातील सर्व गणेशोत्सव मंडळे, दहीहंडी मंडळांसह इतरही मंडळांनी या दूध पिण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नामदेव शिंदे यांनी केले आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

Uttar Pradesh: UP ATS चा धडाका! देवबंदमध्ये मोठी कारवाई; संशयास्पद व्हिडिओ आणि इराण-पाकिस्तान कनेक्शनची चर्चा

Premium|Artificial Intelligence Investment : एआय गुंतवणुकीतून आयटी क्षेत्राला धक्का; भारतीय कंपन्यांसमोर आव्हान

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

SCROLL FOR NEXT