sharad pavar 
पुणे

अपघात झाल्याचे पाहून पवारसाहेबांनी थांबवली मोटार...

योगेश कामथे

खळद (पुणे) : पुरंदर तालुक्यातील मावडी क.प. येथे जेजुरी- मोरगाव रस्त्यावर झालेला अपघात पाहून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तातडीने आपली मोटार थांबवत अपघातात कोणी जखमी झाले नाही ना, याची चौकशी केली. तसेच, संबंधित जेसीबी मालकीची आस्थेने विचारपूस करत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

जेजुरी- मोरगाव रस्त्यावर पुरंदर तालुक्यातील मावडी क.प. या गावच्या हद्दीमध्ये आज एक पोकलेन मशीन रस्त्याच्या बाजूला उभे होते व त्याच्याच बाजूला संबंधित मालकाची फॉर्च्युनर मोटार उभी होती. मात्र, रस्ता खचल्याने जेसीबी मशीन उलटून गाडीवर आदळून अपघात झाला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अशी माहिती जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वेळी पवारसाहेब याच रस्त्याने जात होते. त्यांनी हा अपघात पाहिला. थेट जेसीबी मोटारीवर पडल्याचे पाहून त्यांनी तातडीने आपली मोटार थांबवली व ते अपघातस्थळी गेले. तेथे त्यांनी पाहण केली व व संबंधित जेसीबी मालक बप्पा रामचंद्र चाचर (वय 36) यांना बोलावून घेत अपघातामध्ये कोणी जखमी झाले आहे का, याबाबत आस्थेने विचारपूस केली. तसेच, गाडीच्या झालेल्या नुकसानीबाबत बारामती येथे शोरूममध्ये संपर्क करत तेथे गाडी घेऊन जाण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: ‘तारीख पे तारीख’ युग संपलं? सुप्रीम कोर्टाची हायकोर्टांसाठी नवी डेडलाइन, न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणार नाही

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

SCROLL FOR NEXT