shikrapur 
पुणे

वाळूला क्रशसॅंड बनविण्याच्या महसूलच्या जादूचा पु्न्हा होणार पंचनामा

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील वाळूला क्रशसॅंड बनविण्याच्या प्रकरणात आता प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पुनर्पंचनामा करण्याचे आज आदेश दिले. या पंचनाम्यात दोष आढळल्यास पंचनाम्याशी संबंधित सर्वांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, थेट पोलिस चौकीच्या आवारातच हा प्रकार झाला असताना अद्याप पोलिसांकडून काहीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता. २२) केलेल्या बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. त्यानंतर ट्रक शिक्रापूर पोलिस आवारात लावण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने हा ट्रक शिक्रापूर पोलिसांकडे रितसर सोपविताना शिक्रापूर पोलिसांनी महसूल विभागाच्या अहवालानुसार चोरीचा गुन्हा दाखल करुन कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल आठवडा उलटला तरी महसूल विभागाने याबाबत शिक्रापूर पोलिसांना काहीच कळविले नाही. अर्थात शिक्रापूर पोलिसांनीही स्वत:हून काहीच हालचाल केलेली नाही. दरम्यानच्या काळात या ट्रकमध्ये वाळूऐवजी क्रशसॅंड भरली. हे गौडबंगाल नेमके काय? याबाबत आज प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सक्त कार्यवाही करत सदर ट्रकचा पुन्हा पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार लैला शेख यांना दिले. 

याबाबत श्रीमती शेख यांचेशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, पंचनामा लिहिताना या ट्रकमधील वाळू केवळ अडीच ब्रास दाखविण्यात आलेली आहे. वस्तुत: सदर हायवा प्रकारच्या गाडीत साधारण पाच ते साडेपाच ब्रास वाळू बसते. मात्र, काठोकाठ भरलेल्या या ट्रकमधील वाळू केवळ अडीच ब्रासच पंचनाम्यात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची पाऊले परतीच्या वाटेवर! राज्यात कसं असेल तापमान?

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Pune Municipal Election : तब्बल ३५० लाडक्या बहिणी रिंगणात; विविध राजकीय पक्षांकडून संधी

IND vs NZ : ऋतुराज गायकवाड न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेत खेळू शकणार; BCCI च्या एका अपडेट्सने चित्र बदलणार, श्रेयस अय्यर...

Pune Ring Road : रिंगरोडचे काम प्रगतिपथावर; पश्चिम टप्पा दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT