पुणे

आमदार महोदयांच्या लग्नसोहळ्यातील गर्दीची होणार चौकशी

पांडुरंग सरोदे

पुणे : शहरामधील कोरोनाचे सावट अद्याप दूर झालेले नसतानाही भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही लग्नसोहळ्यात सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यावरून सर्वसामान्यांना वेगळा आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. या पार्श्‍वभूमीवर सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात नियमांचे पालन झाले की नाही, याची चौकशी करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत. 

राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. सातपुते यांचा डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे रविवारी शाही लग्नसोहळा संपन्न झाला. या लग्न सोहळ्यासाठी पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नागरिकांसह राजकीय पक्षांचे नेत्यांनी हजेरी लावली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे सर्व आमदारही यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, शहरातील कोरानाचे सावट दूर झालेले नाही. प्रशासनाकडून नागरिकांवर मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसींगचे पालन करणे याबाबत वारंवार आदेश देऊन पोलिसांकडून कारवाई केली जाते. तसेच सर्वसामान्यांना लग्नसोहळा किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी 50 जणांनाच परवानगी दिली जाते. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. असे असतानाही आमदार सातपुते यांच्या लग्नात मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सींगचे पालन झाले नाही. याबाबतचे व्हिडिओ, छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होऊन, त्याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत पोलिस सहआयुक्त डॉ. शिसवे म्हणाले, "संबंधित लग्नसोहळ्यात उपस्थित नागरिकांकडून नियमांचा भंग झाला आहे काय, याबाबत आमच्यापर्यंत माहिती पोचली आहेत. तसेच याप्रकरणी चौकशीचे करण्याचे आदेश अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना दिले आहेत. जगदाळे यांच्याकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल.'' 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 37 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Nagpur : माजी नगरसेवकाच्या मुलाला ड्रग्ज विकताना अटक; बॉडी बिल्डिंगमध्ये चॅम्पियन अन् जिम ट्रेनर, भाजपशी कनेक्शन

Pune Cafe Goodluck News : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अन् पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेला टाळे, नेमकं काय घडलं?

Success Story: 'सात वेळा अपयशानंतर आठव्या परीक्षेत यशाला गवसणी'; डोणजतील टोपण्णा नाईकची मंत्रालय महसूल साहायकपदी वर्णी

IRCTC Malaysia and Singapore Tour: मग IRCTC च्या भन्नाट टूर पॅकेजचा आनंद घ्या!

SCROLL FOR NEXT