plasma-therapy1.jpg 
पुणे

केळेवाडीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार 'या' उपाययोजना

जितेंद्र मैड

कोथरुड (पुणे) : कोथरुडमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण केळेवाडी परिसरात आढळले आहेत. वस्तीभागातील वाढता कोरोना नियंत्रणात आणावा यासाठी महापालिकेचे अधिकारी, पोलिस यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन उपाय योजना करावी, लोकांच्या समस्यांचे निवारण करावे अशी मागणी नगरसेवक दीपक मानकर यांनी केली होती. वस्ती भागात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काय उपाय योजना करता येईल यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, पोलिस व लोकप्रतिनिधींनी केळेवाडी येथे भेट दिली.


महापौर मुरलीधर मोहोळ, डीसीपी पौर्णिमा गायकवड, नगरसेवक दीपक मानकर, छाया मारणे, वैशाली मराठे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक प्रतिभा जोशी, आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त नितीन उदास, सहाय्यक आयुक्त संदीप कदम, अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप, अविनाश सकपाळ, डॉ. अंजली टिळेकर, विभागीय आरोग्य निरिक्षक राम सोनवणे आदींनी केळेवाडी परिसराची पाहणी केली.

यावेळी महिलांनी रोजगार बंद झाल्याने उपासमारीची वेळ आल्याची तक्रार केली. गरजूंना अन्नधान्याची मदत करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली.  पुणे शहरात 70 मायक्रो कंटेनमेंट आहेत. प्रत्येक ठिकाणी अशी सुविधा देणे शक्य नाही. त्यामुळे  ही मागणी पूर्ण करता येणे शक्य नाही. दानशूर लोकांनी गरजूंना  मदत करण्यासाठी पुढे यावे असे, महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.  नगरसेवक मानकर यांनी सांगितले की,  वस्ती भागातील लोकांना कोरोना तपासणी करण्यासाठी स्थानिक परिसरातील आरोग्य केंद्रात सुविधा पुरवण्यात यावी. राऊत दवाखान्यात अशी सुविधा उपलब्ध झाली तर ते सर्वांच्या सोयीचे होईल. 
 
कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना

  • केळेवाडी मधील महापालिकेच्या राऊत दवाखान्यात होणार स्वॅब टेस्ट
  • वस्तीभागात मास स्क्रीनींग व टेस्टींग करणार.
  • सार्वजनिक स्वच्छतागृह दिवसातून पाच वेळा स्वच्छ केली जावीत यासाठी कर्मचारी वाढवणार.
  • स्वच्छतागृहांची सफाई होते की नाही हे तपासण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करणार
  • वसंत नगर येथील अनाधिकृत झोपड्या पाडणार
  • अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्थानिक कार्यकर्ते यांची मदत घेणार
  • माईक पॉईंट तयार करणार. (माईक वरुन जनतेला सूचना देता यावी यासाठी)
  • नागरीकांनी तातडीच्या कामाशिवाय बाहरे जावू नये यासाठी उपाय योजना करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bhokar Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर ट्रक-टाटा मॅजिकची भीषण धडक; 5 जण जागीच ठार, 8 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Heavy Vehicle Ban : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्यातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी; पोलिस उपायुक्ताकडून आदेश जारी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

SCROLL FOR NEXT