Ujjawala-Shewale
Ujjawala-Shewale 
पुणे

उत्तुंग भरारी समाजकारणाची...

उर्मिला थोरवे

शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले.

लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला. वडिलांनी बांधलेल्या पवना धरणाच्या कॉलनीत पवनानगरला दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये बी. पी. एन. ए. चा कोर्स पूर्ण केला. विसाव्या वर्षी डॉ. सुनील शेवाळे यांच्याबरोबर विवाह झाला. आदर्श शिक्षक असलेले सासू-सासरे सुमनबाई व शांताराम शेवाळे गुरुजी यांनी आई वडिलांच्या प्रेमाची कसर दूर केली. तसेच नेटाने संसार कसा करावा हेही शिकवले. त्यांच्यासह उच्चशिक्षित दोन दीर व तीन नणंदा आशा सुसंस्कारित व सुशिक्षित परिवारात लग्नानंतर येणाऱ्या परिस्थितीशी संघर्ष करीत आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकले. 

सुरवातीचा काळ खडतर पण सुखावह, आनंदी व कष्ट करून प्रगती करण्यात गेला. शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी सर व विद्या गांधी बाई यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, वकृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. पुण्यात असताना डॉ. मोहन आगाशे, अभिनेत्री आशा काळे यांच्याबरोबर एकांकिकेत अभिनयाचे काम केले. व्हॉलिबॉल, खोखो मध्ये राज्यपातळीवर पोचले. आमच्या संसारवेलीवर डॉ. अक्षय व इंजिनिअर शंतनू ही दोन फुले उमलली. त्यांचे शिक्षण, एकत्र कुटुंब व डॉक्‍टरांच्या तुळजाभवानी हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळत, जीवनात सामाजिक क्षेत्रात प्रगती करत, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत, दिवस कसे सरले ते कळलेच नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार, बाळासाहेब ठाकरे व माजी आमदार वल्लभशेठ बेनके हे माझ्या जीवनातील स्थान अढळ आहे. माहेर व सासर दोन्हीही घरच्यांचा पाठिंबा असल्याने राजकारणात काम करण्याची संधीदेखील मिळाली. राजकारण करताना समाजकारणाला प्राधान्य दिले. खोटेपणाची प्रचंड चीड, चुकीच्या घडत असणाऱ्या गोष्टींना विरोध व स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे राजकारण कधी जमलेच नाही. ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठामुळे समाजकारणाची आवड खऱ्या अर्थाने जोपासली गेली अन माझ्या सामाजिक कार्याला एक वेगळी दिशा मिळाली. सकाळचे जुन्नरचे प्रतिनिधी दत्ता म्हसकर सरांना खरे तर याचे सारे श्रेय आहे.

समाजकारण करताना कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याने अनेक महिलांचे भावी जीवन सुसह्य झाले. मोडलेले संसार मार्गी लागले, महिला सबलीकरण व सक्षमीकरण यासाठी नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने, महिला बचतगटांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिमोग्लोबिन व कॅल्शिअम तपासणी, फिजिओथेरपी पद्धती, कॅन्सर जागृती व उपचार आदी शिबिरे भरवून महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली.

सुजाण पालकत्व, महिला सुरक्षा, वाहन प्रशिक्षण यासारखे अनेक उपक्रम घेतले. समाजातील गरीब व गरजू घटकांना संक्रांतीचे वाण म्हणून तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजेच्या वस्तू दिल्या. तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमतंर्गत पोलिस बांधवांना पौष्टिक आहार दिला.

शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठवला व ते मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. प्लॅस्टिक व कचरा मुक्तीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. धार्मिक सलोखा वाढवा यासाठी अनेक कार्यक्रम घेतले. जलदिंडी, पाणीपरिषद, वृक्षारोपण, जुन्नरला शिवाई यात्रेत महिलांसाठी स्टॉल उभारणी करून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न केले. रोटरी क्‍लब, विविध सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कामाची व्याप्ती वाढली.

बचत गट चळवळ उभी केली, तरुण तरुणींच्या समस्या सोडवून त्यांना नोकरी, व्यवसाय मिळवून दिले. घर, प्रापंचिक जबाबदारी सांभाळून हे केले. सामाजिक कार्याला झळाळी देणारे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, जिवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी, हॉस्पिटलचे कर्मचारी, हितचिंतक यांच्या सदैव ऋणात राहून मला भावणारे माझे काम असेच पुढे सुरू राहील यात शंका नाही, यासाठी तुमची सदैव साथ लाभो हीच मनोकामना. 

विविध संस्थांनी माझ्या सामाजिक कामाची दखल घेत मला पुरस्काराने सन्मानित केले, त्यामुळे काम करण्यास अधिक प्रोत्साहन मिळाले ते पुरस्कार पुढीलप्रमाणे : नॅशनल युनिटी ॲवॉर्ड, आदर्श फाउंडेशन, शिवांजली भूमीकन्या साहित्य गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, इन्फोटेक वेल्फेअर मिशन, मुंबई. बेस्ट ॲन, रोटरी क्‍लब, कर्तृत्ववान आदर्श माता पुरस्कार, आदर्श महिला ॲवॉर्ड, कादरिया वेल्फेअर सोसायटी, आदर्श रणरागिणी पुरस्कार, पंचायत समिती, लक्ष्य सबला पुरस्कार, लक्ष गुरुकुल भोसरी. आदर्श महिला समाजभूषण, वारकरी प्रबोधन समिती महाराष्ट्र राज्य, जुन्नर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT