विशालनगर - पदपथावर चार दिवस आठवडे बाजार भरविला जात असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून जावे लागते. 
पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये आठवडे बाजाराला हप्तेखोरीचे ‘कवच’

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ग्रामीण भागातील आठवडे बाजार संस्कृती पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून चांगलीच नावारूपाला आली आहे. मात्र रस्ते, पदपथ अडवून राजरोसपणे भरणाऱ्या या बाजारांना महापालिका अधिकारी, राजकारणी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या हप्तेखोरीचे ‘कवच’ मिळत असल्याने आठवडे बाजाराचा ‘बाजार’ फोफावला आहे.

आठवडे बाजार म्हणजे आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व ठिकाणी भरणारा बाजार. परंतु, आता काही परिसरात तो चार दिवस भरविला जात आहे. अशाप्रकारे प्राधिकरण, रावेत, भोसरी, रहाटणी, चिंचवड या भागात दोन दिवस तर वाकड-विशालनगर परिसरात नव्याने बनविलेल्या आणि जुन्या पदपथावर दर सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी तो भरतो. त्यासाठी स्टॉलधारकांकडून रुपये प्रत्येकी ३०० वसूल केले जात असल्याची तक्रार आहे. 

पदपथाच्या जागांचे दर
आठवड्यातील एका दिवसासाठी भरणारे बाजार स्थानिक कार्यकर्त्यांच्या हप्तेखोरीचे साधन बनले आहे. या बाजारात पदपथावरील जागांचे दरही ठरतात. मोक्‍याची जागा मिळविण्यासाठी संबंधिताला हाताशी धरले जाते. नागरिकांसाठी मात्र ते डोकेदुखी ठरत आहेत. तर शहर नियोजनात अडथळा ठरत आहेत. वाकड-विशालनगर परिसरात नव्याने बांधलेले पदपथ चार दिवस व्यापले जात आहेत. परिणामी, बालेवाडी किंवा हिंजवडी येथून विशालनगर मार्गे जाणाऱ्या डीपी रस्त्याला सायंकाळी कोंडीचा सामना करावा लागतो. तसेच येथे अपघातही होतात. सायंकाळी ज्येष्ठांना पदपथावरून चालणे मुश्‍कील होतो. मध्यंतरी बाजारांवर बंदी घातली होती. मात्र, काही दिवसांनी तो पुन्हा जोमाने सुरू झाला असून त्याला आता हप्तेखोरांचे कवच लाभल्याने बाजाराची समस्या गंभीर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT