crime
crime Sakal
पुणे

आंतरराज्य टोळीचा म्होरक्या पकडला युवकांनी, कॅालर उडवली पोलिसांनी

रमेश वत्रे

केडगाव - पारगाव (ता. दौंड) येथील युवकांनी धाडसाने आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. या युवकांचे परिसरातून कौतुक होत आहे. यवत पोलिसांनी या घटनेचे क्रेडीट घेण्यासाठी आज पत्रकार परिषद घेत मोठा बेबनाव केला आहे. यातून यवत पोलिसांचा प्रसिद्धीचा हव्यास पुन्हा एकदा उघड झाला आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, सचिन बोत्रे ( रा. पारगाव ) यांचा मालवाहतूक करणारा ट्रक २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री पारगाव येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे डिझेल भरून उभा होता. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एक आयशर कंपनीचा टेम्पो ट्रकशेजारी येवून उभा राहिला. टेम्पोमधील चोरट्यांनी ट्रकमधील ३९ हजार रुपये किमतीचे ४०० लिटर डिझेल चोरून नेले. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. बोत्रे यांनी डिझेल चोरीची तक्रार यवत पोलिस स्टेशन मध्ये दिली.

सात ऑक्टोंबरला हा संशयित टेम्पो पारगाव चौकातून जाताना सचिन बोत्रे यांना दिसला असता त्यांनी त्वरित पोलिस मित्र वैभव बोत्रे यांना सांगितले. वैभव बोत्रे यांनी त्वरित केडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पद्यराज गंपले यांना माहिती देत लगेच टेम्पोचा पाठलाग सुरू केला. टेम्पो ड्रायव्हरला संशय आल्याने त्यांना बोत्रे यांच्या वाहनावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. परंतू वैभव बोत्रे यांनी धाडसाने सदर टेम्पो अडवण्यात यश मिळवले. टेम्पो थांबताच त्यातील संशयीत उड्या टाकून उसाच्या शेतात फरार झाले.

टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्याकरिता चालवला असता टेम्पोचा पाठलाग एक आलिशान मोटार करत असल्याचे वैभव बोत्रे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित त्याची कल्पना पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांना दिली. गंपले त्यांनी घटनेच्या दिशेने पोलिस पाठवले. पाठलाग करणारी अलिशान मोटार पारगाव-केडगाव रस्त्यावरील जोगेश्वरी मिसळ या हॉटेलजवळ स्थानिकांनी अडवली. त्यावेळी गाडीत एका महिलेसह चौघे जण होते. त्यानंतर पोलिस जोगेश्वरी मिसळ या ठिकाणी आले. मोटारीतील संशयितांना ताब्यात घेवून चौकशी केली असता आंतरराज्य डिझेल चोरीमध्ये ते सहभागी असल्याचे आढळले. या कामी पारगाव येथील पोलिस मित्र वैभव बोत्रे, राहुल टिळेकर, निलेश धुमाळ, विक्रम शिंदे, प्रशांत शिंदे, सागर बोत्रे यांनी अतिशय धाडसाने आंतरराज्य टोळी पकडुन देण्यात मोलाचे सहकार्य केले.

पोलिसांनी मात्र पत्रकार परिषदेत म्होरक्यास केले जेरबंद, पोलिसी खाक्या, पोपटासारखा बोलू लागला, वरिष्ठांच्या मार्गदर्शानाखाली, गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार, रेकॅार्डवरील गुन्हेगार, पथक, अनेक गुन्हे उघडकीस येणार, असे गोड गोड शब्द प्रयोग शिताफिने वापरले आहेत. या शब्द प्रयोगांचा आणि कारवाईचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे चर्चा परिसरात होत आहे.

मोटारीतील तीन व्यक्ती नेमक्या कोण

स्थानिकांनी अडविलेल्या अलिशान गाडीत एका महिलेसह चौघेजण होते. पोलिसांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत व फोटो सेशनमध्ये राजवीर गजराजसिंग मल्होत्रा हा एकच संशयित अटकेत दाखविला आहे. इतर तीघेजण कुठे गेले असा प्रश्न पारगाव ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषदेत पोलिसांनी स्थानिक युवकांच्या सहकार्याचा एका वाक्याने उल्लेख केला नाही. मोटारीतील महिला मल्होत्रा याची पत्नी तर दोन युवक त्याचे मुलगे असल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. असे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT