Isis fugitives most wanted terrorist who absconded from Pune was arrested in Delhi Sakal
पुणे

Pune Crime : पुण्यातून फरार झालेल्या दहशतवाद्यास दिल्लीत अटक

‘इसिस’च्या फरार ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘इसिस’च्या फरार ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. पुणे पोलिसांनी जुलैमध्ये कोथरूड परिसरात तीन दहशतवाद्यांना पकडले होते. त्यांना घराची झडती घेण्यासाठी घेऊन जाताना तिघांपैकी एकजण कोंढवा परिसरातून पसार झाला होता.

महंमद शाहनवाझ शफीउझ्मा (वय ३०) असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. पुण्यातून पसार झाल्यानंतर तो दक्षिण दिल्लीतील जैतपूर परिसरात वास्तव्यास होता. याबाबत दिल्ली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने त्याला रविवारी (ता. १) रात्री अटक केली. शाहनवाझ व्यवसायाने अभियंता आहे.

त्याच्या ताब्यातून केमिकल पावडर, बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला फरारी घोषित करून त्याच्यावर तीन लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. पुणे पोलिसांनी १८ जुलैला पहाटे कोथरूड परिसरातून आरोपी महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३) आणि महंमद युनूस महंमद याकुल साकी (वय २४, दोघे रा. मिठानगर, कोंढवा.

मूळ रा. रतलाम, मध्य प्रदेश) यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाझ शफीउझ्मा पसार झाला होता. कोथरूड पोलिसांनी २२ जुलैला या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविला. सध्या या गुन्ह्याचा तपास ‘एनआयए’कडून करण्यात येत आहे.

यापूर्वी गुन्ह्यात दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी ‘एटीएस’ने कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा. कोंढवा) व सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, मूळ रा. रत्नागिरी) यांना अटक केली होती. झुल्फिकार अली बडोदावाला याला मुंबई कारागृहातून ताब्यात घेतले होते. तर इसिस मॉड्युलचा महाराष्ट्रात प्रसार केल्याप्रकरणी डॉ. अदनान अली सरकार याला कोंढव्यातून अटक केली होती.

बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण

शाहनवाझ शफीउझ्मा याच्यासह तिघा दहशतवाद्यांनी घातपाती कारवायांसाठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या कोंढव्यातील घरातून लॅपटॉप, ड्रोन, नकाशा, बॉम्ब बनविण्याचे साहित्य, केमिकल पावडर साहित्य जप्त केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT