Bed 
पुणे

भिगवण येथील रुग्णांचे हाल; आरोग्य विभागाची विलगीकरण कक्षाकडे पाठ

प्रशासनाच्या असंवदेनशीलतेचा त्रास रुग्णांना सहन करावा लागला; तर केवळ राजकीय सूडबुद्धीने येथे आरोग्य सुविधा उपलब्ध दिल्या नाहीत, असा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला.

प्रशांत चवरे

भिगवण : जिल्ह्यामध्ये कोरोना वाढीचा वेग अधिक असणाऱ्या भिगवण (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शंभर बेडचा विलगीकरण कक्ष उभारला होता. परंतु, आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षाकडे पाठ फिरविल्यामुळे मंगळवारी (ता. ११) तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची हाल झाले. प्रशासनाच्या असंवदेनशीलतेचा त्रास रुग्णांना सहन करावा लागला; तर केवळ राजकीय सूडबुद्धीने येथे आरोग्य सुविधा उपलब्ध दिल्या नाहीत, असा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला.

भिगवणमध्ये कोरोना वाढीचा वेग अधिक असल्यामुळे प्रातांधिकाऱ्यांनी येथील तारादेवी लॉन्स, आदर्श विद्यालय व शाम गार्डन येथे विलगीकरण कक्ष उभारण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनास दिले होते. ग्रामपंचायतीने युद्ध पातळीवर तारादेवी लॉन्स येथे शंभर बेडचा विलगीकरण कक्ष उभारून रुग्णांसाठी जेवण, नाश्‍ता, पाणी आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. मंगळवारी सकाळी दहा वाजता या कक्षाचे उद्घाटन करण्यात येणार होते. परंतु, सकाळी दहापासून दुपारी दोनपर्यंत वारंवार संपर्क करूनही आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी येथे फिरकला नाही. याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. प्रशासन कोरोनाबाबत खरोखरच गंभीर आहे का? असा प्रश्न रुग्णांनी केला. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी भिगवण ग्रामपंचायतीने उभारलेल्या कोरोना विलगीकरण कक्षास भेट दिली. पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, सरपंच तानाजी वायसे, माजी सरपंच पराग जाधव, पिंटू शिंदे, जयदीप जाधव, हरिश्चंद्र पांढरे, तुषार क्षीरसागर, संपत बंडगर, कपिल भाकरे व ग्रामपंचायत सदस्य या वेळी उपस्थित होते.

प्रशासनाची असंवेदनशीलता

या विलगीकरण कक्षाची सुरवात सकाळी दहा वाजता करण्यात येणार होती. विलगीकरण कक्ष व चाचणी सुविधा सुरु होणार, अशी माहिती मिळताच येथे अनेक रुग्ण तपासणीसाठी व विलगीकरण कक्षामध्ये दाखल होण्यासाठी आले होते. सकाळी दहापासून कोरोना सदृश लक्षणे असणारे ज्येष्ठ नागरिक दुपारी दोनपर्यंत आरोग्य विभागाची सर्वजण वाट पाहात होते. याबाबत पदाधिकारी व पत्रकार यांनी प्रातांधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता केवळ ‘करतो, बघतो’ अशी उत्तरे मिळाली. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे रुग्णांचे मोठे हाल झाले.

भिगवण ग्रामपंचायतीने प्रातांधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार माजी सहकारमंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर बेडचा विलगीकरण कक्ष उभारला आहे. येथे अद्याप आरोग्य कर्मचारी उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. कोरोना महामारीच्या काळातही तालुक्यात राजकारण केले जात असून, तालुक्यातील जनतेला वेठीस धरले जात आहे, ही दुदैवाची बाब आहे.

- अंकिता पाटील, जिल्हा परिषद सदस्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT