पुणे

तात्पुरता निर्णय असल्याने आयटीयन्सना फटका नाही 

सकाळवृत्तसेवा

पुणे - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एच-वन बी आणि एल-वन व्हिसा बंदबाबतचा निर्णय हा तात्पुरता आहे. त्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील काही महिने परदेशी जाणे अवघड असणार आहे. यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाचा आयटी उद्योगावर फारसा परिणाम होणार नसल्याचे मत आयटी व अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

आयटी कंपन्यांमधील कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत, हीच प्रक्रिया अजून काही महिने सुरू राहील. 

याबाबत हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीश पै म्हणाले, ""गेल्या चार महिन्यांपासून आयटी कंपन्यांमधील कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता त्या वेळेस आयटीयन्स परदेशात कामासाठी जात असत. आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आताच्या परिस्थितीत कामामध्ये हुशार असणारी मंडळी जगात कुठेही बसून काम करू शकत आहेत. त्यामुळे भविष्यात त्याचा फार मोठा परिणाम आयटी उद्योगावर होईल, अशी कोणतीही शक्‍यता नाही.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आयटीयन्स म्हणतात... 

1) आयटी कंपनीतील नोकरी म्हणजे विदेशात काम करण्याची संधी मिळते, असा अनेकांचा समज असतो. तिथे काम करणारे बहुतेकजण आपल्याला खास करून अमेरिकेत काम करण्याची संधी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करत असतात. कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेने व्हिसा देण्याची प्रक्रिया थांबवली असल्याने देशातील आयटीयन्सना आता वाट पाहण्याखेरीज पर्याय नाही. 
- कौसवकुमार, आयटी अभियंता 

2) अमेरिकेने व्हिसा देण्याची प्रक्रिया कायमस्वरूपी बंद केलेली नाही. सध्या जगभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीसाठी विदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण तसेही कमीच झालेले आहे. त्यामुळे आता निर्माण झालेली स्थिती ही तात्पुरती आहे. पुढल्या एक ते दोन वर्षांमध्ये पुन्हा अमेरिकेत जाण्याची संधी मिळू शकते. 
- निषाद गोरे, अभियंता 

3) अमेरिकेने एच-वन बी, एल-वन व्हिसा देण्याची प्रक्रिया थांबवल्यामुळे परदेशात जाऊन काम करण्याचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. 
सध्या या व्हिसावर काम करणाऱ्या मंडळींनादेखील भविष्यात अडचणींचा सामना करावा लागेल. 
- अमित अपराजित, अभियंता 

4) ट्रम्प सरकारच्या व्हिसा स्थगितीच्या निर्णयामुळे कंपन्यांचे प्रोजेक्‍ट्‌स पुढे ढकलले जातील. नोव्हेंबरमधील निवडणुकीच्या दृष्टीने आणि कोरोनासंदर्भातील लक्ष विचलित करण्यासाठी अमेरिकन सरकारने हा निर्णय घेतला असावा. अमेरिकन उद्योगांची गरज बघता, डिसेंबरनंतर सर्व पूर्ववत होईल, याचा दीर्घकालीन परिणाम फारसा होणार नाही. 
- आनंद वाळुंजकर, ऑरेंज कौंटी, यूएसए 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT