Pune Politics Esakal
पुणे

Pune Politics: ‘त्या’ बॅनरबाजीवरील टीका जिव्हारी, पोस्टरवरून जगदीश मुळीक म्हणाले...

मुळीक यांच्या बॅनर्सवर भाववी खासदार असा उल्लेख करण्यात आलेला होता त्यामुळेही टीका करण्यात आली

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. या बॅनर्सवर मुळीक यांचा उल्लेख भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुळीक यांच्यावर जोरदार टीका केली होती.

या बॅनर वरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करत किती बेशरम असावं माणसांनी असं म्हंटलं होतं. आव्हाड यांची टीका जगदीश मुळीक यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्यावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुळीक यांनी आव्हाड यांना औरंजेबत संबोधत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केल्याचेही बॅनर्सही पोस्ट केले आहेत.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन तीन दिवसही झाले नाहीत तोच जगदीश मुळीक यांचा भावी खासदार उल्लेख करणारे बॅनर्स लागल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येऊ लागली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे. त्यानंतर हे बॅनर्स हटवण्यात आले. आव्हाड यांची टीका जिव्हारी लागल्याने मुळीक यांनी जितेंद्र आव्हाड यांना ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्विटमध्ये त्यांनी म्हंटलं आहे की, "बरं झालं मुंब्र्याच्या औरंग्यानं गरळ ओकली. या हिंदुद्वेष्ट्याकडून संस्कार शिकण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. फेकन्यूजवर पोसलेल्या या माणसानं फोटोची साधी खातरजमा करायचे कष्ट घेतले नाहीत! प्रसिद्धीसाठी देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही बनणाऱ्या जितुद्दीनला आता जनतेनं पुरतं ओळखलं आहे, अशी खोचक टीका जगदीश मुळीक यांनी केली आहे.

जगदीश मुळीक यांनी पुण्यात लावलेलं एक बॅनर्स पोस्ट केलं आहे. त्यात त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेला निवेदन केलं आहे. माझ्या वाढदिवसादिनी अर्थात 1 एप्रिल रोजी दरवर्षी आपण मला भरभरून शुभेच्छा देता, विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करता आपल्या या सदिच्छा मला आजवर निश्चितच पाठबळ देत आल्या आहेत. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। या लोकनेते स्व. गिरीशभाऊ बापट यांच्या निधनामुळे 1 एप्रिल रोजी असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून सर्वांनी याची नोंद घ्यावी. वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम रद्द करण्यात आले आहेत, असं पोस्टरमध्ये जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT