पुणे

पुरंदर तालुक्यात लवकरच गुळ कारखाना : आमदार संजय जगताप

दत्ता जाधव

माळशिरस : पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी तालुक्यात पोचल्याने मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. या ऊसाला चांगला बाजार भाव मिळावा व त्यांतून तरूणांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून तालुक्यात लवकरच गुळ कारखाना सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माळशिरस येथे बेलसर माळशिरस जिल्हा परिषद मतदार  संघातील आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत कार्यालयांना जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे  यांच्या फंडातून सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी दत्ता झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, सरपंच महादेव बोरावके, उध्दव भगत, माजी सरपंच एकनाथ तात्या यादव, माऊली यादव, बाळ तात्या यादव, लक्ष्मण महाराज यादव, संपत वाघले वैद्यकीय अधिकारी विवेक अबनावे, तंटामुक्तती समितीचे अध्यक्ष गणेश यादव, मोहन यादव उपस्थितीत होते. 

यावेळी आमदार संजय जगताप म्हणाले की, सध्या कोरोनाच्या महासंकटामुळे नागरिकांनी सोशल डिस्टंन्स पाळण्याची गरज असून सॅनिटायझरचा वापर करणे महत्वाचे आहे. यादृष्टीने दत्ता झुरंगे यांनी लावलेला आजचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कोरोनामुळे निधीची कमतरता असली तरी पुढील काळात अधिकाधिक विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असून तालुक्यातील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी व पुरंदर उपसामुळे वाढलेल्या ऊसाला चांगला बाजार भाव मिळण्यासाठी तालुक्यात लवकरच गुळ कारखाना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दत्ता झुरंगे यांनी यावेळी मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. सरपंच महादेव बोरावके यांनीही मनोगत व्यक्त केले.

 गुंजवणीचा अभ्यास नव्हे दुरूस्ती-
गुंजवणीचे पाणी हे सर्वांना मिळाले पाहिजे व योग्य त्या पध्दतीने सर्वां पर्यंत पोहचवण्यासाठी दुरूस्तीचे काम चालू आहे. योजनेचा अभ्यास नव्हे असा टोला माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नाव न घेता लगावला.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT