Jayant Patil claim that there is Bogus voter registration in graduate elections 
पुणे

पदवीधर निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी; जयंत पाटील यांचा दावा

सकाळवृत्तसेवा

पुणे : पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुका जिंकण्यासाठी बोगस मतदार नोंदणी झाल्याचा घणाघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी पुण्यात केले. काहीही करून निवडणुका जिंकायच्याच या हव्यासातून वाटेल तो मार्ग निवडतात, याकडे लक्ष वेधत पाटील यांनी भाजपवर शरसंधान साधले.

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, उमेदवार अरूण लाड, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेवक दीपक मानकर, दिव्या प्रतिष्ठानचे हर्षवर्धन मानकर आदी यावेळी उपस्थितीत होते.

 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

पाटील म्हणाले, "केंद्र आणि राज्य सरकारांच्या धोरणांमुळेच रोजगार आणि उद्योग-व्यवसाय अडचणीत आले. याच काळात पदवीधरांचे अनेक प्रश्न उभे ठाकले, तो सोडविण्यासाठी भाजपचे तेव्हाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काय केले ? या प्रश्नाचे उत्तर हे नकारात्मक असतील, हे पदवीधरांनी विसरायला नको.

पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पदवीधर आहेत. त्यांच्या मागण्या आहेत. परंतु, त्याची दखल घेतली जात नाही. हे वारंवार दिसून येत आहे. मात्र, यापुढच्या महाविकास आघाडी पदवीधरांच्या निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये. याची काळजी घ्या' असेही पाटील यांनी सांगितले. पुण्यातील पदवीधरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणार असल्याचे लाड यांनी सांगितले.

पदवीधरांना न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळात स्वतंत्र खाते स्थापन करा : नगरसेवक दीपक मानकर

महाराष्ट्रात पदवीधर हा घटक आता आपल्या दृष्टीने मतदार समजतो. तो घटक मोठा आहे, त्यांना सक्षम करण्याची विशेषत: त्यांना रोजगार देण्याची आठवण ही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतच होते. ही शोकांतिका आहे. या पुढे तसे करून भागणार नाही. त्यामुळे या घटकाचे प्रश्न समजून घेऊन, ते सोडविण्यापुरते मर्यादित न राहाता, पदवीधरांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळात स्वतंत्र खाते स्थापन करावे, असा आग्रह नगरसेवक दीपक मानकर यांनी धरला.

दौंडमध्ये पहिल्या दिवशी फक्त दहा टक्केच उपस्थिती
सुडाचे राजकारण आम्ही कधी केले नाही :जयंत पाटील​

राज्यात भाजपचे सरकार आले तेव्हा विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपविण्याचा कटच रचण्यात आला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्यांची राजकीय आणि सामाजिक ताकद आहेत, अशा नेत्यांना अडचणीत आणले गेले. मात्र, हे सरकार आल्यानंतर अशा नेत्यांना पुन्हा बळ देण्यात येत आहे. पण हे सुडाचे राजकारण आम्ही कधी केले नाही आणि करणारही नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. तर या निवडणुकीत परिवर्तन करूच असे मानकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT