jayant patil maharashtra politics vajramooth sabha of mahavikas aghadi -kolhapur pune nashik will be cancelled
jayant patil maharashtra politics vajramooth sabha of mahavikas aghadi -kolhapur pune nashik will be cancelled   Esakal
पुणे

Vajramooth Sabha : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा रद्द; जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून गोंधळ सुरू असताना आता महाविकास आघाडीतर्फे घेतल्या जाणाऱ्या वज्रमूठ सभांचे नियोजनही बिघडले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे होणाऱ्या वज्रमूठ सभा रद्द झाल्या आहेत. त्यांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातर्फे वज्रमूठ सभांचे आयोजन केले जात होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नेते उपस्थित राहत होते. संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई येथे वज्रमूठ सभा यशस्वीपणे पार पडल्या. त्यापुढे होणाऱ्या पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. त्यादृष्टीने तयारीही सुरू करण्यात आली होती.

पुणे दौऱ्यावर असलेल्या जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील वज्रमूठ सभांच्या तारखा बदलण्यासंदर्भात अनौपचारिक चर्चा झाली होती. या तीन ठिकाणच्या सभांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आधी नाराजी नंतर स्पष्टीकरण

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आयोजित केली असून, त्यास जयंत पाटील हे उपस्थित नसल्याची चर्चा सुरू होती. पुण्यात याबाबत पत्रकारांनी विचारले असता पाटील यांनी ‘‘राष्ट्रवादीच्या या बैठकीला मला बोलवण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलंच पाहिजे, असा आग्रह आपण करू नये, असे स्पष्टीकरण दिले.

त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता, आता मुंबईमध्ये कोणतीही बैठक सुरू नाही, संध्याकाळी पाच वाजता बैठक होणार असून, त्यासाठी मी उपस्थित राहणार आहे. नवीन अध्यक्ष स्वीकारला जाईल का या चर्चेला अर्थ नाही. शरद पवार यांनीच अध्यक्षपदी रहावं हीच आमची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

SCROLL FOR NEXT