Jayesh Kasa increase custody and adsuls Bail application rejected 
पुणे

जयेश कासटच्या कोठडीत वाढ; अडसूळचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खंडणी प्रकरणात अटक केलेल्या पोलिस मित्र जयेश भगवानदास कासट याच्याकडून पोलिसांनी पाच लाख रुपये जमा केले. त्यानंतर त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत 21 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली. दरम्यान, याच प्रकरणातील मनोज अडसूळ याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून गुरूवारी सुनावणी होणार आहे. 

डॉ. हेमंत तुकाराम अडसूळ (वय 55, रा. सहकारनगर) यांनी विश्रामबाग ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचा भाऊ मनोज अडसूळने डॉ. दीपक रासने यांच्याकडून 75 लाख रूपये घेतले होते. त्याबाबतची माहिती कासटला मिळाल्यानंतर त्याने अडसूळ याला खंडणीच्या गुन्ह्यात अडकवून धमकी दिली. त्याच्याकडून पाच लाख रुपये उकळले होते. तसेच उर्वरित पैशांसाठी तगादा लावला होता. कासटला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यास मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी त्यास 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

काँग्रेसच्या 'या' दिग्गज नेत्याची होणार चौकशी; चारशे कोटींचे प्रकरण

दरम्यान, विनयभंग व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून डॉक्‍टरकडून 75 लाखांची खंडणी उकळणाऱ्या अडसूळ याच्या अटकपूर्व जामीन अर्जाबाबत मंगळवारी सुनावणी झाली. त्याच्या अटकपूर्व जामिनाला सरकारी पक्षाने विरोध केला. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात गुरूवारी (ता.20) पुढील सुनावणी होणार आहे. याप्रकरणी डॉ. दीपक प्रभाकर रासने यांच्या मुलाला ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून अडसूळने डॉ. रासने यांच्याकडून 75 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर तो 55 लाख रुपये त्यांच्याकडे मागत होता. याप्रकरणी अडसूळ याने ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अडसूळला खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी ठोंबरे यांनी केली. त्यास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. या प्रकरणाचा सखोल तपासासाठी आडसूळला अटक करणे गरजेचे आहे, असा युक्‍तीवाद ऍड. पाठक यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 Declared : बारावीचा 89.79 टक्के निकाल; यंदाही मुलींनीच मारली बाजी, पुणे-मुंबई की कोकण? कोणता विभाग अव्वल? जाणून घ्या सविस्तर...

Satej Patil statement Gokul Milk : सतेज पाटलांची मुश्रीफांच्या गोकुळमधील राजकीय भूमिकेवर जोरदार टीका, 'जसास तसे उत्तर देऊ'...

8 सामने झाले तरी धोनी का नाही खेळला? आज मुंबईविरुद्ध 'थाला'ची एन्ट्री होणार का? 5 वाजता होणार मोठा निर्णय, वाचा ताजी अपडेट

Toll Free Expressway: 'या' एक्सप्रेसवेवर १५ दिवस 'टोल फ्री' प्रवास! मुख्यमंत्र्यांचे जनतेला मोठे गिफ्ट; पर्यटनाला मिळणार बुस्ट

LPG Chhotu Cylinder: छोटू गॅस सिलेंडरचे भाव भडकले! घरगुती LPG पेक्षाही तिप्पट महाग; 5 किलो गॅस आता कितीला?

SCROLL FOR NEXT