पुणे

आता चार वेळा होणार जेईई मेन्स परीक्षा; 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान पहिली परीक्षा 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकात झालेल्या बदलामुळे जेईई मेन्स परीक्षेच्या वेळापत्रकातही मोठा बदल झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईने फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात कधीही परीक्षा देता येणार आहे. फेब्रुवारी 2021 मधील परीक्षा 22 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान होणार असून, अर्ज भरण्याची मुदत कालपासून (ता. 15) सुरू झाली आहे.
 
कोरोनामुळे बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडल्याने देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या कालावधीत ही परीक्षा होईल. त्यामुळे "जेईई मेन्स' परीक्षेच्या आयोजनात अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून "नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (एनटीए) चार टप्प्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना एक किंवा त्यापेक्षा जास्त वेळा परीक्षा देता येईल. ही परीक्षा महाराष्ट्रात 27 शहरांमध्ये तर देशात 329 शहरांमध्ये होणार आहे. याबाबत अधिक माहिती www.jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

आयआयटीएन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, ""फिजिक्‍स, केमिस्ट्री, मॅथ या विषयांचे सेक्‍शन ए आणि बी मध्ये मिळून 90 प्रश्‍न विचारले जातील. त्यापैकी 75 प्रश्‍न सोडविणे अनिवार्य आहे. सेक्‍शन ए मध्ये प्रत्येक विषयाचे 20 प्रश्‍न एमसीक्‍यू तर सेक्‍शन बी मध्ये न्यूमॅरिकल व्हॅल्यूच प्रत्येक विषयाचे 10 प्रश्‍न विचारले जातील. त्यापैकी पाच प्रश्‍न सोडवायचे आहेत. सेक्‍शन बी प्रमाणे ए मध्ये प्रश्‍नांची संख्या जास्त असती तर विद्यार्थ्यांना आणखी दिलासा मिळाला असता.'' 

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

एलन करिअर इन्स्टिट्यूटचे पुणे शाखेचे प्रमुख अरुण जैन म्हणाले, ""यावेळी प्रथमच विद्यार्थ्यांना चारवेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने प्रत्येक परीक्षेत गुणांमध्ये वाढ झाल्यास त्याचा फायदा रॅंकिंगमध्ये होऊ शकेल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महत्वाच्या तारखा 
अर्ज भरण्याची मुदत - 15 डिसेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 
शुल्क भरण्याची अंतिम मुदत - 16 जानेवारी 2021 
प्रवेशपत्र उपलब्ध - 6 फेब्रुवारी 2021 
जेईई मेन्स परीक्षा - 22 ते 25 फेब्रुवारी 2021 
निकाल - 6 मार्च 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणी संजय राऊतांचा मोठा दावा, भाजपवर थेट इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT