JEJuri 
पुणे

जेजुरीच्या खंडेरायाला सफरचंदाची महापूजा, फुलांची सजावट  

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : एका भक्ताने दिलेल्या सफरचंदाची खंडोबाला महापूजा व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. त्यामुळे गाभा-यातील वातावरण प्रसन्न झाले होते.

देवसंस्थान व मानकरी यांच्याकडून नित्य होत असलेल्या पुजेवेळी केलेली सफरचंद व फुलांची सजावटीने गाभा-यातील वातावरण खुलले होते. पुणे येथील खंडोबाचे भक्त असलेले उद्योजक झेंडे परिवाराने सद्याच्या कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि सुखसमृद्धी मिळावी, या करिता खंडोबाच्या पूजेसाठी सफरचंद व फुले दिली होती. गाभा-यातील स्वयंभू लिंगास 101 सफरचंद फळांची महापूजा करण्यात आली. 

सध्या खंडोबा मंदिर बंद असले, तरी त्रिकाळ नित्य पूजा दररोज केली जाते. सफरचंदाची व फुलांच्या सजावटीने गाभा-यातील वातावरण प्रसन्न झाले होते. सफरचंदाचे आयुर्वेदामध्ये महत्व असल्या कारणाने सफरचंदाचा प्रसाद म्हणून वापर केला जात असतो. सध्याच्या कोरोना संकटकाळ लवकर दूर करण्याचे साकडे यावेळी घालण्यात आले. 

या वेळी देवसंस्थान विश्वस्त पंकज निकुडे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सचिन उपाध्ये, शशिकांत सेवेकरी, चेतन सातभाई, किसन कुदळे, सोमनाथ उबाळे, जालिंदर खोमणे, विजय खोमणे, प्रकाश भापकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंगावर काटा आणणारा थरार! समोर वाघ आणि मागे विहीर; शेतकऱ्यासह बैलाची जीव वाचवण्यासाठी धडपड, शेवटी...

झी मराठीचा गाजलेला नायक साकारणार स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत मुख्य भूमिका; गाजवलेली आधीची भूमिका

Nashik Traffic : नाशिककर सावधान! ४० सिग्नलवर तिसरा डोळा सक्रिय; सिग्नल तोडाल तर थेट मोबाईलवर येणार दंडाचा मेसेज

Hulikunteshwara Temple : 'देवा, माझी सासू पुढच्या जत्रेआधी मरू दे..'; दानपेटीत शंभराच्या नोटेवर नवसाची चिठ्ठी, धक्कादायक मजकूर

Pune News: रशियात विद्यार्थ्यांनी साजरी केली शिवजयंती; शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके, शिवरायांच्या विचारांचा गौरव!

SCROLL FOR NEXT