crime news esakal
पुणे

Pune Crime: बायकोसाठी काय पण, तिला नवं घर देण्यासाठी नवऱ्यानं चोरले ३७ लाखांचे दागिने

पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली

रुपेश नामदास

पुण्यातील कोंढवा भागत एका मोठ्या चोरीच्या घटनेची उकल झाली आहे. मात्र या चोराने केलेल्या चोरी मागे त्यांच प्रेम असल्याचं त्यांने सांगितलं. कोंढव्यात राहणाऱ्या बबीता डिसूजा यांनी ख्रिसमसच्या दिवशी त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार कोंढवा पोलिसांकडे दिली होती.

ख्रिसमस असल्याने डिसूजा कुटुंबीय रात्री बाहेर गेले असता आरोपीने घराच्या पाठीमागून येऊन खिडकीला लावलेले ग्रील तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्याने मौल्यवान दागिने चोरले तसेच घरातील सोने चांदीच्या दागिन्यांबरोबर डायमंड नेकलेस आणि महागडी घड्याळ हे देखील लंपास केली.

डिसूजा कुटुंबीय जेव्हा घरात परतले असता त्यांना सगळा पसारा आढळून आला. यांनी थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. स्थानिक पोलिसांबरोबरच युनिट ५ कडे या घटनेचा तपास दिल्यानंतर त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक संशयित व्यक्ती घराच्या भागात वावरत असताना आढळून आले.

या व्यक्तीच्या गाडी नंबर वरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान मलाप्पाने हे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे कारण दिल्यानंतर पोलीस देखील बुचकळ्यात पडले.

प्रेम विवाह झाल्यामुळे घरचे फारसं लक्ष देत नव्हते आणि त्यांच्यात अनेक वेळा वाद झाले. प्रेम विवाह केल्यामुळे घरच्यांनी घरातून हाकलून दिले होते मात्र पत्नीसाठी नवीन घर घेता यावं आणि तिथे एकत्र राहता यावं यासाठी त्याने घरफोडी करण्याचा प्लॅन बनवला होता. दरम्यान आरोपीकडून सोन्याचे व हिऱ्याचे दागिने असा ३७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: लालबागच्या राजाची आरती सुरू

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT