Jignesh Mewani 
पुणे

Video : आपल्या डोळ्यासमोरच भाजप-संघाची समाप्ती होईल : मेवाणी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकला असेल किंवा नसेल. परंतु, भगवान रामाला विकायला निघाले आहेत. मोदी-शहा आणि मोहन भागवत हे ज्वलंत प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मंदिर-मस्जिद आणि हिंदी भाषेवरून फूट पाडत आहेत." ,अशा तिखट शब्दांत गुजरात मधील दलित नेते आमदार जिग्नेश मेवाणी यांनी टीका केली. 

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा संविधान दिन सोहळा समिती आणि राष्ट्रीय दलित एकता मंचातर्फे, पिंपरी येथे भारतीय संविधान जनजागरण अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक मारूती भापकर, संयोजक नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ आदी यावेळी उपस्थित होते. 

मेवाणी म्हणाले, "नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघे आणि मी देखील गुजराती आहे. परंतु, त्यांचे नाते नथुराम गोडसे, गोळवलकर आणि सावरकर यांच्याशी आहे. तर माझे नाते राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडले गेले आहे. भारतीय राज्य घटनेला नष्ट करून मनुस्मृती लागू करण्याचा त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मात्र, आम्ही राज्य घटनेच्या मार्गावरून चालणारे आहोत."

देशात हिंदी भाषा लागू करण्याच्या अमित शहा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना मेवाणी म्हणाले, "हे दोघे सत्तेवर आल्यावर काय होईल.याची आम्हाला यापूर्वीच कल्पना होती. भारताच्या विविधतेत सौंदर्य दडले असताना हिंदी भाषा जबरदस्ती लादली जात आहे. तामिळनाडू येथे हे लोक जाऊन म्हणतील हिंदी भाषा बोला. मात्र, कोणती भाषा बोलायची याचा अधिकार आम्हाला राज्य घटनेने दिला आहे. या सत्ताधारी फॅसिस्ट लोकांना सत्तेची मस्ती चढली आहे. परंतु, मोदी-शहा, भागवत हे युगानुयुगे राहणार नाहीत. आपल्या डोळ्यासमोरच भाजप-संघ यांची समाप्ती होईल."

देशातील विरोधी पक्ष उध्वस्त झाले असल्याचे नमूद करून मेवाणी म्हणाले, "भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. अन्यथा महाराष्ट्रात २८८ पैकी ८० जागाही त्यांच्या निवडून येणार नाहीत. परंतु, हे शक्य झाल्यास देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री होणार नाहीत. दुष्काळ ग्रस्त मराठवाडा-विदर्भाला पाणी देण्याची फडणवीस सरकारची दानत नाही. मात्र, महाजनादेश यात्रेमधून मते गोळा करायला निघाले आहेत."

कोळसे-पाटील म्हणाले, "संभाजी भिडे - मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी दलित विचारवंतांना अटक करण्यात आली. पुण्यातील एल्गार परिषदेला नक्षलवादाशी जोडले गेले."

अंधेरा बहोत घना है। ... 
अंधेरा बहोत घना है। काले बादल छाए हुए है, आगे का रास्ता दिखाई नहीं दे रहा.. इसलिए, जो भी इमानदार आप के साथ है.. उसके साथ चलो. हम अंधेरे को चीरते हुए निकल जाएंगे "असे आवाहनही मेवाणी यांनी केले. तसेच शहीद हेमंत करकरे यांची हत्या आरएसएस ने केली असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT