Sinhagad
Sinhagad sakal
पुणे

जिंजी ते सिंहगड ११०० किलोमिटरची पायी गरूडभरारी मोहिम

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिम व तसेच छत्रपती राजाराम महाराजांच्या गरूडभरारी मोहिम याचे स्मरण करण्यासाठी “जिंजी ते सिंहगड अशी पायी प्रवास मोहिम” आग्रावीर व सहस्र दुर्गवीर ॲड.मारूती गोळे यांनी आखली आहे. हे अंतर सुमारे अकराशे किलोमीटर असून यासाठी २६ डिंसेबर २०२१ ते २६ जानेवारी २०२२ असा सुमारे ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष आहे. म्हणून ही मोहिम २६ जानेवारी २०२२ रोजी सिंहगडावरून अर्पण करण्याचा ॲड. गोळे यांचा मनोदय आहे. या वर्षात त्यांनी भारतीयांना अर्पण केलेली ही त्यांची दुसरी मोठी मोहिम आहे. रविवार, दि २६ डिंसेबर रोजी सकाळी सात वाजता ऐतिहासिक जिंजी किल्ल्यातून या मोहिमेची सुरूवात करणार आहे. या तीस दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातील असंख्य शिवप्रेमी ठिकठिकाणी या मोहिमेचे स्वागत करणार आहेत.

गरूडभरारी मोहिम का

मराठ्यांच्या इतिहासात दोन राजांचे प्रवास खुप गाजले आहेत. शिवछत्रपतींचा आग्र्याचा प्रवास( आग्रा ते राजगड) तर दुसरा प्रवास शिवछत्रपतींचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचा जिंजीचा प्रवास. (रायगड- पन्हाळगड- जिंजी आणि परत जिंजी ते सिंहगड). औरंगजेबाच्या कचाट्यातून निसटण्यासाठीचे हे दोन्ही प्रवास होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे युध्द हे स्वराज्याच्या स्वातंत्र्य निर्मीतीसाठी होते. तर छत्रपती राजाराम महाराजांचे युद्ध स्वराज्याच्या रक्षणासाठी होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज या पिता- पुत्रांनी केलेला दक्षिण दिग्विजय हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदूस्थानसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून सिंहगडला आले. त्या यंदा घटनेचे ३२४ वे वर्ष आहे. जिंजी ते सिंहगड अशी पायी मोहिम कोणी केल्याचे ऐकिवात नाही. असे गोळे यांनी सांगितले. केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपुर्ण भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या मोहिमेतून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाचा जागर, निरोगी आरोग्याचा, पर्यावरण रक्षणाचा, गडकोट संवर्धनाचा आणि करण्याचा संदेश ते समस्त भारतीयांना देणार आहेत.

स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहीली राजधानी राजगड येथे केली होती. त्यानंतर, दुसरी राजधानी रायगड येथे केली होती. छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे १६८९ मध्ये आले. त्यांनी तेंव्हा पासून स्वराज्याचा कारभार जिंजी येथून नऊ वर्ष केला. त्यामुळे जिंजी ही स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखली जाते. जिंजीतून ते २६ डिसेंबर १६९७ ला निघाले. आणि विशालगड येथे २२ फेब्रुवारी १६९८ ला पोचले. त्यानंतर सिंहगडला आले. येथे आल्यावर त्यांची प्रकृती ठीक नव्हती. छत्रपती राजाराम महाराज यांचे तीन मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले.

कोणत्या मार्गाने ही मोहिम

गोळे यांच्या पदभ्रमणचा मार्ग : जिंजी, नालूर, उटणगिरी, कृष्णगिरी, होसुर, बेंगलोर, तुमकूर, कातानहल्ली, दादासिदावनहल्ली, हेबाळू, राणेबेन्नूर, हुबळी, टेगुर, बेळगाव, कोल्हापूर, कराड, सातारा, शिरवळ, खेडशिवापूर, शिवापूर, कोंढणपूर, कल्याण, कल्याण दरवाजा, सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराज समाधी समोर मोहिम संपेल.

कोण आहेत मारुती गोळे

स्वराज्यातील पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे १४ वे वंशज. ॲड.मारूती गोळे यांनी ही मोहिमआखली आहे. आणि ते एकटे हे अंतर पार करणार आहेत. सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा वारसा समर्थपणाने पुढे घेऊन जाणारे मारूती गोळे गेले १० वर्षे विविध साहसी मोहिमा यशस्वी करतात आहेत. भारतासह जगभरातील सुमारे १३०० किल्यांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांनी २०१६ साली एकट्याने आग्रा ते राजगड हा १३०० किलोमिटर पायी प्रवास केला. ही मोहिमपूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक साहसाला पुन्हा नव्या पद्धतीने त्यांनी देशाच्या समोर आणले होते. स्वराज्यरूपी स्वातंत्र्याची शिवज्योत घेऊन १७ ऑगस्ट २०२१ ते २९ ऑगस्ट २०२१ या १२ दिवसात त्यांनी आग्रा ते राजगड हे १३०० किलोमिटर अंतर आपल्या ३० सहकाऱ्याबरोबर धावत पुर्ण केले होते. आता ते स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी केलेल्या जिंजी ते सिंहगड गरूडभरारीचे स्मरण करत सुमारे ११०० किलोमिटर एकटे पायी येत आहेत. सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन व सिंहगड पावित्र्य मोहिमेचा आयोजनात सहभाग आहे.

मोहिमेस आशीर्वाद

  • २३ डिसेंबर २०२१ दुपारी १२ वाजता, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, न्यू पॅलेस कोल्हापूर, येथे - कोल्हापूर संस्थान

  • २४ डिसेंबर २०२१ सांयकळी ५ वाजता श्रीमंत शिवाजीराजे भोसले तंजावर संस्थान येथे - तंजावर संस्थान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT