jito covid center.jpg 
पुणे

कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) :  जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाईजेशन (जितो) या व्यापारी संस्थेने कोरोना संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपली आहे. या संस्थेने डेक्कन येथे उभारलेल्या जितो कोविड सेंटरमधून आत्तापर्यंत ४०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे औषधे आणि इतर आरोग्याच्या सुविधांबरोबरच कोविड सेंटरची (आयसोलेशन सेंटर) कमतरता निर्माण होत असल्याचे लक्षात येऊ लागले. त्यावेळी जितोच्या सक्षम शाखांनी महाराष्ट्रात चिंचवड, पिंपरी, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, पुणे, इचलकरंजी, नाशिक येथे कोविड सेंटरची उभारणी करण्याचे मोठे पाऊल उचलले. जितो पुणे यांच्या सहयोगाने पहिले कोविड सेंटर पुण्यात उभारण्यात आले असल्याचे अॅपेक्स जीतोचे उपाध्यक्ष विजय भंडारी यांनी सांगितले.

जितोच्या कोविड सेंटरमध्ये हॉस्पिटलसारखी दर्जेदार डॉक्टर्स, उत्तम ट्रीटमेंट आणि नर्सेसची सोय करण्यात आली आहे. शिवाय हॉस्पिटलचे प्रोटोकॉल, गाईडलाइन्स पाळून आवश्यक ती काळजी या सेंटरमध्ये घेतली जाते. यामध्ये उत्तम खाण्याची सोय, मनोरंजन, डायनिंग हॉल आणि आरामदायक बेड आणि स्टाफसाठी कॉन्फरन्स हॉलची सोय करण्यात आली असल्याचे जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल यांनी सांगितले. आजपर्यंत जितो संस्थेकडून पंच्याऐंशी लाखाहून अधिक फूड किटचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये आवश्यक औषधे, स्प्रे मशीन, पीपीई किट यांचेही वाटप केले गेले. 

  • आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक पेशंट बरे होऊन घरी
  •  सध्या १३० पेशंट दाखल आहेत.
  • २०-२२ लोकांची वेटिंग लिस्ट
  • डॉ. अशोक संचेती व डॉ. मांगीलाल ओसवाल यांचे नेतृत्वाखाली १२ डॉक्टरची टीम आणि ३० मेडिकल स्टाफ सेवा देत आहेत.
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT