Dr_Ravindra_Shisve 
पुणे

पुण्यात लॉकडाऊन कधी सुरू होणार? पोलिस सहआयुक्त म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सोमवारी (ता.१३) मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरू होईल, त्यामुळे सोमवारी दिवसभर शहर नियमितपणे सुरू राहील, असे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लॉकडाऊन सोमवार सकाळपासून सुरू होणार असल्याच्या चर्चेला आणि अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याने आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. सोमवारी मध्यरात्री (ता.१४) रात्री १२ वाजल्यापासून ते २४ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे, असे प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाकडून पोलिस ठाण्याच्या पातळीवर लॉकडाऊनच्या दृष्टीने सर्व तयारी केली जात आहे. मात्र स्थानिक पातळीवरील पोलिसांकडून लॉकडाऊन सोमवारी सकाळपासूनच लागू होणार असल्याचे नागरिकांना सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्वभूमीवर डॉ. शिसवे म्हणाले, "प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल. म्हणजेच सोमवारी नेहमीप्रमाणे शहर दिवसभर सुरू राहील. नागरिकांनी नाहक चर्चा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये."

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election Dispute : 'गोकुळ' अध्यक्षपदाचा वाद पोहोचला कोर्टात; शशिकांत चुयेकरांच्या निवडीबाबत सोमवारी निर्णय, महायुतीच्या 12 संचालकांनाही धाडली नोटीस

Radhanagari Wildlife Sanctuary : पर्यटकांसाठी खूशखबर! 'या' तारखेपासून दाजीपूर-राधानगरी जंगल सफारी सुरू; अभयारण्यात काय काय असणार खास?

Gokul Chairman Election Controversy : नविद 'गोकुळ'चे अध्यक्ष व्हावेत हे मुख्यमंत्र्यांसमोर ठरलं, नाव सुचविण्याबाबत सतेज पाटलांचा काही संबंध नाही; हसन मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं

Marathi News Live Updates : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन

Pune News: पुण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी गुड न्यूज! पीएमपीचा मोठा दिलासा; १ नोव्हेंबरपासून बस तिकिटात ५० टक्के सवलत

SCROLL FOR NEXT