rain
rain 
पुणे

पश्चिम महाराष्ट्रात जोर गावात सर्वधिक ३७११ मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या जोर गावात एक जून पासून तीन हजार ७११ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज येथे तीन हजार ३१६, कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरण येथे तीन हजार ३१२, सातारा जिल्हातील वळवण येथे तीन हजार २७३ तर पुणे जिल्हातील मुळशीतील दावडी ताम्हिणी तीन हजार २०८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

हा पाऊस एक जून पासुन आज २३ जुलै पर्यंत पडलेला आहे. जल विज्ञान प्रकल्पाच्या संकेतस्थळावरील व पाटबंधारे विभागच्या पूर नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली आहे. खंबाटकी घाटाच्या पश्चिमेला जोर गाव आहे. वाई पासून ३२ किलोमीटर आहे. गाव समुद्र सपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. कराडच्या पश्चिमेला पाथरपुंज गाव आहे. पाटण पासून २८ किलोमीटर आहे. गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ६१० मीटर उंचीवर वसलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव धरण आहे. वळवण गाव महाबळेश्वर पासून ७८ किलोमीटर हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे एक ३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. मुळशी धरणाच्या आतील भागात दावडी ताम्हिणी भागात आहे. दावडी ताम्हिणी हे गाव कोलाड रस्त्यावर पौड येथून ३२ किलोमीटर आहे.

भीमा खोऱ्यातील पाउस मिलीमीटर

गावाचे नाव (तालुक्याचे/ धरणाचे नाव) एक जून पासून आज पर्यत पडलेला पाऊस मिलीमीटर मध्ये

दावडी (मुळशी)- ३२०८, भीमाशंकर (चासकमान)- २९०७, खिरेश्वर (पिंपळगाव जोगा)- २७४७, शिरगाव (भोर)- २५०४, कुंभेरी (मुळशी)- २४०९, घीसर(वेल्हे)- २३१७, भूतोंडे(भोर)- २१७९, पांगारी (भोर)- २१४४, लवासा(दासवे)- २०९२, सवाळे (मावळ)- २०९२, कोळे(मावळ)- २०४७, शिरवली (भोर)- १८७९, हिरडोशी(भोर)- १८५३, कुरुंजे (भोर)- १८३१, भालवडी (वेल्हे)- १७९८, खंडाळा(मावळ)- १६८६, शिरकोली (वेल्हे)- १६५३, भट्टी वाघदरा (वेल्हे) - १६५०, टेमघर (मुळशी)- १५७१, वडिवळे (मावळ)- १५१२, वेल्हे -१२९५, वरसगाव (वेल्हे)- १२९३.

कृष्णा खोऱ्यातील सातारा जिल्हा

जोर (वाई)- ३७११, पाथरपुंज (पाटण)- ३३१६, वळवण (सातारा)- ३२७३, महाबळेश्वर- २८८५, नवजा (पाटण)- २७५२, प्रतापगड (महाबळेश्वर)- २३०२, कोयनानगर (पाटण)- २१६९, कोयना (धरण)- २१५८, सांडवली (सातारा)- २०९८, कास (सातारा)- २०६६, सोनत (महाबळेश्वर)- १८४८, मोळेश्वरी (जावळी)- १८१०, काती (पाटण)- १७२०, बामणोली (सातारा)- १५५०, ठोसेघर (सातारा)- १३६३, धोम-बलकवडी (धरण)- १२९६,

कृष्णा खोऱ्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्हा

पाटगाव(धरण)- ३३१२, हसने (राधानगरी)- २५२०, गजापूर (शाहूवाडी)- २४०८, रेवाचे वाडी (गगनबावडा)- २३३९, कासारी(धरण)- २१७२, राधानगरी(धरण)- २०६२, वाकी (राधानगरी)- २०१२, मांडुकली (गगनबावडा)- २००८, निवळे (शाहूवाडी)- १९३६, कादवी डॅम (शाहूवाडी)- १८९६, तुलसी(धरण)- १८९४, दुधगंगा(धरण)- १४६७,पाडळी (राधानगरी)- १४५४, कुंभी डॅम (गगनबावडा)- १४१४, दूधगंगानगर (राधानगरी)- १३८८, धनगरवाडा (शिराळा)- १३२०, भागुजी पाटीलवाडी (राधानगरी)- १३१७, तांदळवाडी (पन्हाळा)- १२९१, वारणा (शिराळा)- १२९०, वारणावती(धरण)- १२६७, जांबुर (शाहूवाडी)- १२३३.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT