पुणे

जम्बो, सोनाका द्राक्षे मार्केट यार्डात दाखल

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड - गोड-रसाळ द्राक्षे मार्केट यार्डमधील फळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. सध्या बाजारात दररोज दोन ते अडीच टन आवक होत आहे. द्राक्षास गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्के अधिक भाव मिळत आहे.

बिगरमोसमी अथवा हंगामपूर्व द्राक्षे बाजारात विक्रीसाठी आणण्याची पद्धत सुरू झाली आहे. या प्रकारामुळे हंगामाचा कालावधी वाढत चालला आहे. सध्या डिसेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत द्राक्षांचा हंगाम समजला जातो. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून द्राक्षाची हंगामपूर्व आवक सुरू झाली आहे. बाजारात बारामती, फलटण आणि इंदापूर येथून काळी जम्बो आणि सांगली जिल्ह्यातील सोनाका द्राक्षांची आवक होत आहे. तसेच पुढील काही दिवसात सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातूनही आवक सुरू होणार आहे. घाऊक बाजारात जम्बो (काळा रंग) द्राक्षास १० किलोस १००० ते १३०० रुपये, तर सोनाका (हिरवा रंग) द्राक्षास १० किलोस ९०० ते ११०० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. यंदा हवामान चांगले असल्याने द्राक्षांचा दर्जा चांगला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या द्राक्षांना गोड चव आहे. येत्या काही दिवसात आवक अजून वाढणार आहे. मागीलवर्षी याचवेळी द्राक्षांची आवक सुरू झाली होती. सध्या बाजारात दाखल होणाऱ्या द्राक्षांना पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड येथूनही मागणी आहे. विशेषत: महाबळेश्‍वर, वाई, लोणावळा आणि कोकणातील पर्यटन भागातून द्राक्षांना जास्त मागणी आहे. परराज्यामध्ये गोवा, गुजरात आणि कोलकता येथे द्राक्षे पाठविली जात असल्याचेही मोरे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT