Teachers 
पुणे

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी दिलाय आंदोलनाचा इशारा; काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्य सरकारने पावले उचलावित. आगामी अधिवेशनात याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र सरकारने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने  दिला आहे.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी महासंघाने आतापर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलने केली. मूल्यांकन पात्र घोषित, अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे, याबाबत मागील मंत्रालयामध्ये स्वतः शिक्षक तसेच पदवीधर आमदारांसह अर्थमंत्र्याशी चर्चा केली असल्याचे समजते. मात्र, केवळ घोषित यादीचा विचार न करता अघोषित यादीतील शिक्षकांचा देखील विचार वेतन अनुदान देताना करावा, अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात दशकांहुन अधिक काळ वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना पद मंजूर आणि वेतन अनुदान देण्यात यावे, अशी महासंघाची मागणी आहे.

आयटी शिक्षक गेल्या २० वर्षापासून विनावेतन किंवा अल्प वेतनावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात आयटी शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणात मोलाची भूमिका बजावत आहेत. याशिवाय बोर्डाच्या परीक्षेत ऑनलाइनची सर्व कामे हे शिक्षक करतात. त्यामुळे या शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतन अनुदान देणे गरजेचे आहे.

याबाबत आगामी अधिवेशनात निर्णय होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात राज्य सरकारने महासंघासमवेत बैठक आयोजित करावी. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी  कार्यवाही न झाल्यास नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

IND vs SL, Test: साई सुदर्शनच्या जागी सरफराजच का? ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होण्यामागचं कारण आलं समोर!

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

Management Admissions: राज्यात बीबीए-बीबीएम-बीएमएस व एकात्मिक एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १२ हजार २८२ विद्यार्थ्यांना संधी, ८४८५ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT