Teachers_Day 
पुणे

ऐन शिक्षक दिनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पाळला 'काळा दिन'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सुमारे ५० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी काळ्या फिती बांधून अध्यापन तसेच ॲडमिशनचे काम शनिवारी (ता.५) केले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

राज्यात कार्यरत असलेल्या ७० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांपैकी सुमारे ४० हजार शिक्षक कोणत्या ना कोणत्या तरी समस्येने ग्रस्त आहेत. अनुदान, नियुक्ती मान्यता, शालार्थ, वेतन श्रेणीत मान्यता, वेतन निश्चिती करण, वरिष्ठ तसेच निवडश्रेणी न मिळणे, पदोन्नती, पदोन्नतीची मान्यता, कापलेल्या रकमेचा हिशोब नसणे, विनाअनुदानित/अंशतः अनुदानितमध्ये वेतन न मिळणे किंवा अत्यल्प वेतन मिळणे, निवृत्तीनंतरचे लाभ वेळेवर न मिळणे अशा सर्व प्रकारच्या टप्प्यावर शिक्षकांना त्रास दिला जात आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटना वारंवार आंदोलन करीत आहे. पण शिक्षणमंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. हा असंतोष शिक्षकांनी काळा दिवस पाळून व्यक्त केला असल्याचे सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्या, वाढीव शिक्षक पदांना मान्यता द्या, आय.टी. विषय शिक्षकांना वेतन श्रेणी द्या, जुनी पेन्शन योजना लागू करा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करा, या मान्य मागण्यांचे आदेश त्वरित काढावेत, यासाठी महासंघाने हे आंदोलन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT