अमोल कोल्हे
अमोल कोल्हे sakal
पुणे

आवास योजनेतून गरजू लाभार्थी वंचित राहिल्याची खंत : अमोल कोल्हे

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर तालुक्यात घरकुलाची खरी गरज असणारे अनेक पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहीले आहेत. याबाबत संसदेत हा प्रश्न मांडून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा अशी विनंती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना करण्यात आली.

जुन्नर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शनिवारी ता.२३ रोजी आढावा बैठक झाली. यावेळी खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी ही मागणी केली.

पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे, तसेच सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

घोलप म्हणाले, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२२ अंतर्गत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जुन्नर तालुक्यात २०१८ मध्ये ११ हजार ७९७ लाभार्थ्यांचा सर्व्हे झाला.त्यात ७ हजार ५०५ लाभार्थी पात्र ठरले तर ४ हजार २६७ लाभार्थी अपात्र ठरले तर २५ लाभार्थी स्थलांतरीत असल्याचे नमूद केले आहे.शासनाच्या अपात्र यादीमध्ये ज्यांना खरोखर घरकुलाची गरज आहे असे अनेक गरजू लाभार्थी वंचित राहिले आहेत.

शासनाच्या निकषाप्रमाणे यात भाड्याने राहणारी कुटुंबे तसेच मोबाईल व गाडी असणारी कुटुंबे ऑनलाइन सर्व्हेमध्ये अपात्र ठरली आहेत. या सर्व्हे दरम्यान एप लॉगिन न झाल्याने तालुक्यातील खानगाव,ओझर नंबर २, रोहकडी, उंब्रज नंबर.२, व बेल्हे ही पाच गावे सर्व्हेमधून राहिली आहेत तर आदिवासी भागातील कोपरे,मांदारणे ह्या दोन गावांचा सर्व्हे होऊन यात एकही लाभार्थी पात्र झाला नाही. काही ठिकाणी सर्व्हे व्यवस्थित झाला नसल्याने अनेक कुटुंबे अपात्र ठरली आहेत.

खामगाव मधील अनेक गरजू लाभार्थी पात्र यादी मध्ये आले नसल्याचे घोलप यांनी सांगितले. तालुक्यातील प्रत्येक गावाने अपात्र यादीत आलेल्या गरजू लाभार्थ्यांचा पुन्हा सर्व्हे होण्यासाठी ग्रामसभेत ही नावे घ्यावीत. तसा ठराव मंजूर करून पंचायत समितीला पाठवावा असे आवाहनही घोलप यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT