Bee Attack sakal
पुणे

Bee Attack : लेणी पाहण्यास आलेल्या मुंबईच्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; पाच पर्यटक गंभीर जखमी

माणमोडी डोंगरात असलेल्या भुतलेणी समुह येथे लेणी पहाण्यासाठी आलेल्या मुंबईच्या अकरा पर्यटकांवर आज शनिवार ता.२५ रोजी दुपारी मधमाशांनी हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर - आगार-खोरेवस्ती, ता. जुन्नर जवळील माणमोडी डोंगरात असलेल्या भुतलेणी समुह येथे लेणी पहाण्यासाठी आलेल्या मुंबईच्या अकरा पर्यटकांवर आज शनिवार ता.२५ रोजी दुपारी मधमाशांनी हल्ला केला. यात पाच पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.

मुलुंड, डोंबिवली व नेरुळ येथून हे पर्यटक लेणी पाहण्यास आले होते. लेणी पहात असताना मोबाईलच्या विजेरीचा प्रकाश पडल्याने मधमाशा उठल्या व त्यांनी अचानक हल्ला केला. यामुळे पर्यटकांनी आपले जवळील सामान, मोबाईल तेथेच टाकून पळ काढला. मधमाशांच्या दंशामुळे जखमी झालेल्या पर्यटकांना जुन्नर येथील प्रशांत कबाडी यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणले.

वनरक्षक रमेश खरमाळे, तेजस शिंदे, ऋषिकेश गाढवे, भरत चिलप, दिपक सांगडे यांची मदत झाली. पर्यटकांच्या वस्तू लेणीतून आणून त्यांना देण्यात आल्या. पर्यटकांवर जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले यापैकी पाच रुग्णांना नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुष्पांवती कांबळे, प्रियदर्शन कांबळे, आरती वाघमारे, सुवर्णा कांबळे, पंडित थोरात यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT