Police arrest Sakal
पुणे

बंद घरातून केली होती चोरी; 'त्या' तिघांना ४८ तासाच्या आत अटक

गवारवाडी येथील दोन अल्पवयीन मुलांसह ओंकार बाळू गवारी वय ३५ यास संशयावरून पोलीसांनी ताब्यात घेतले.

दत्ता म्हसकर

जुन्नर : गवारवाडी-वैष्णवधाम ता. जुन्नर येथे झालेल्या घरफोडीत रोख रकमेसह पाच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या आरोपींना जुन्नर पोलीसांनी ४८ तासांच्या आत जेरबंद केले असल्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. (Pune District Crime Updates)

गवारवाडी येथील दोन अल्पवयीन मुलांसह ओंकार बाळू गवारी वय ३५ यास संशयावरून पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.चोरीस गेलेले सोन्याचे सर्व दागिने व काही रक्कम मिळून चार लाख १९ हजाराचा ऐवज पोलिसांनी त्यांचेकडून हस्तगत केला आहे.

यातील दोन अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.ओंकार यास जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे,पोलीस निरीक्षक विकास जाधव यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पवार,पोलीस कर्मचारी लोहकरे,म्हस्के,पठारे, जोरी,वणवे,कारखीले यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

विमल बाळू गवारी यांनी या चोरीची फिर्याद दिली होती. गवारवाडी येथे वस्तीपासून दूर एकाकी असलेले त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अल्पवयीन मुलाच्या मदतीने छताची कौले उचकटून चोरट्यानी घरात प्रवेश केला होता. घरातील कपाटे, सोफा, बेड, याची उचकापाचक करून सोन्याचे पाच तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र, दीड तोळे वजनाचा लक्ष्मी हार, सात ग्रॅमची सोन्याची नथ, नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची तीन कर्णफुलाचे जोड, व रोख रक्कम ९० हजार रुपये असा एकूण चार लाख ९० हजाराचा ऐवज लंपास केला होता. बुधवार ता.१२ रोजी वाढदिवसाच्या कार्यक्रमास परगावी गेल्याचे पाहून त्यांनी ही चोरी केली. गवारी गुरुवारी ता.१३ रोजी घरी आल्यानंतर त्यांना चोरीची घटना समजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT