beating to police sakal
पुणे

Police Beating : बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यास अंजनावळेत मारहाण

गावात तमाशा कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास जमावकडून धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

दत्ता म्हसकर

गावात तमाशा कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास जमावकडून धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

जुन्नर - अंजनावळे, ता. जुन्नर येथे बंदोबस्त करत असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील आरसीपी पथक क्रमांक दोन मधील जुन्नर येथे नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यास जमावकडून धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

गावात तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना सोमवार ता. ८ मे रोजी पहाटे ही घटना घडली. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पर्वते यांनी सांगितले.

पोलीस कर्मचारी तोफिक निसरोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शंकर नामदेव डोळस ह्या मुख्य आरोपीसह घनश्याम उर्फ सगन लांडे, सुरज विरनक, तुषार लांडे, तुषार साबळे, संदीप घुटे, सचिन लांडे, गणपत घोटकर, बुधा वाळकोळी, युवराज वाळकोळी, वसंत लांडे, युवराज आढारी, निंबा मांगले, रोहित लांडे, रामदास लांडे, लालू इदे, अशोक लांडे, सागर घोटकर, किरण लांडे, कुणाल कोंदे सर्व रा. अजनावळे, ता. जुन्नर यांचे विरुद्ध पोलीसांनी शासकीय कामात अडथळा आणणे व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अंजनावळे येथे आदिवासी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध कार्यक्रम झाले रात्री तमाशा सुरू असताना स्टेजच्या डाव्या बाजूला काही मुले उठून गोंधळ करत होती. त्यांना खाली बसा असे समजावून स सांगत असताना यातील एका मुलाने शेख यांची कॉलर पकडून खाली पाडून काठीने मारहाण केली.

तेथे असलेल्या १५ ते २० जणांनी शिवीगाळ दमदाटी करत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान बंदोबस्तास असणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांनी शेख यांनी सुटका केली. पोलीस पाटील गुणाबाई लांडे यांच्याकडून मारहाण करणाऱ्याच्या नावाची खात्री केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोंथा इफेक्ट! विदर्भात ऑरेंज तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट; दोन दिवस मुसळधार

Latest Marathi News Live Update : 'शासनाने काढलेला जीआर रद्द करावा', नांदेडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मोर्चा

Nagpur Farmers Protest : बच्चू कडूंच्या नेतृत्वात हजारो शेतकरी नागपूरच्या वेशीवर धडकले, महामार्ग ठप्प; आज 'रेल्वे रोको'चा इशारा

संजय दत्तच्या 'या' व्हिस्की ब्रँडमध्ये आहे तरी काय? महिन्याला 10 लाख बाटल्यांची होते विक्री, वेड्यासारख लोक का खरेदी करतायत?

धक्कादायक! 'वृद्धेला इंजेक्शन देऊन दागिने लंपास'; साताऱ्यात केअर टेकर महिलेसह दोघांना अटक; पाच तोळे चाेरीस..

SCROLL FOR NEXT