शिवरायांची सर्वात मोठी प्रतिमा  Sakal
पुणे

जुन्नर : शिवरायांची सर्वात मोठी प्रतिमा रांगोळीतून साकारण्यास सुरवात

शिवजयंतीच्या पूर्व संध्येला रविवारी ता.२० रोजी ही रांगोळी पूर्ण होईल असे त्रिमीतीय रांगोळी उपक्रमाचे समन्वयक दर्शन फुलपगार यांनी सांगितले.

दत्ता म्हसकर

जुन्नर : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार (२१ मार्च रोजी) साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या निमिताने किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची त्रिमितीय प्रतिमा (थ्रीडी) रांगोळीतून साकारण्यास आज ता.१७ पासून सुरवात झाली आहे. शिवजयंतीच्या पूर्व संध्येला रविवारी ता.२० रोजी ही रांगोळी पूर्ण होईल असे त्रिमीतीय रांगोळी उपक्रमाचे समन्वयक दर्शन फुलपगार यांनी सांगितले.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर महेंद्र मेटकरी,भाग्यश्री देशपांडे , शेखर दरदरे यांच्यासह पासष्ट कलाकार असून यात चौदा मुली आहेत. सुमारे तीस हजार चौरस फूट क्षेत्रात ही रांगोळी साकारणार असून यासाठी तीन ते चार दिवस लागणार आहेत.

ही फक्त रांगोळी नसून यामध्ये शिवाजी महाराज त्यांच्या आज्ञापत्रावर रेखाटले जाणार असून त्यांची राजमुद्रा सुद्धा यात असणार आहे. यासाठी बारा टन रांगोळी लागणार असून सुमारे दहा लाख रुपये खर्च येणार आहे. संपूर्ण रांगोळी थ्रीडी असणार आहे. जगात आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची यांची इतकी मोठी थ्री डी रांगोळी झालेली नाही. शिवजन्मभूमीत ती प्रथमच साकारली जात आहे. या अनोख्या रांगोळीसाठी माजी आमदार शरद सोनवणे यांचे सहकार्य लाभले असून दर्शन फुलपगार यांच्या मार्गदर्शनाने विश्वविक्रमी रांगोळी साकारणार आहे.

जुन्नर तालुका शिवसेना परिवाराकडून शिवजयंतीला किल्ले शिवनेरी रात्री गडावर विद्युतझोत टाकून प्रकाशमान करण्यात येणार आहे. जुन्नरमध्ये सर्वत्र भगवे झेंडे तसेच शिवाजी महाराजांचीच भव्य छायाचित्रे लावण्यात येणार आहेत. शिवभक्तांना जिलेबीचे वाटप करण्यात येणार आहे.

नारायणगाव येथे शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत.आळेफाटा येथे चला हवा येवू द्या हा मनोरंजनपर कार्यक्रम तर डोमेवाडी येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT