junnar
junnar 
पुणे

गणेशोत्सवात जुन्नरला विशेष पोलिस अधिकारी नियुक्त करणार

दत्ता म्हसकर

जुन्नर - जुन्नरला गणेशोत्सवात  ग्राम सुरक्षा दलाचे जवान व पोलीस मित्र यांची पोलिसाबरोबर विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी सांगितले.  

आगामी गणेशोत्सवाचे निमित्ताने जुन्नर शहरातील मानाच्या चौदा गणेश मंडळाचे अध्यक्ष व प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकते यांची पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी डॉल्बी-डिजीटलचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करणे.अनावश्यक खर्चास फाटा देऊन समाजोपयोगी कामे करणे. मंडपामुळे रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.वर्गणीसाठी जबरदस्ती करू नये. मंडळास लागणारा विद्युत पुरवठा तात्पुरते स्वरूपात विजजोड घेऊनच वापरावा बेकायदेशीर विद्युत पुरवठा घेवू नये.मंडळांनी रात्री व दिवसा स्वयंसेवक नेमावेत.गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या सर्व  परवानग्या घेण्यात याव्यात. आदींबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सूचना व मार्गदर्शन केले

गणेश उत्सव मंडळांना वेळेत मिरवणुका पार पाडणे बाबत सूचना देण्यात आली.तसेच नगर परिषदे मार्फत विसर्जन घाटाचे ठिकाणी निर्माल्य गोळा करन्याची सोय व विजेची व्यवस्था करण्यास सूचना देण्यात आली आहे. 

उत्सव काळात अवजड मोठी वाहने शहरात येणार नाहीत याबाबत  व्यापरी वर्गास खबरदारी घेणे बाबत कळविण्यात आले आहे. गणपती मंडळच्या कार्यकर्त्यांनी  पोलिसाबरोबर रात्र गस्तीत सहभागी व्हावे अशी सूछान करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी तसेच गणपती मार्गावर वाहने पार्किंग होणार नाहीत याबाबत सूचना व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे.      

सर्व गणपती मंडळानी सिसिटीव्ही कॅमेरे बसावावेत. गुलाल न उधळता गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी उत्सव काळात अफवा पसरऊ नये याबाबत सूचना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT