नीलम गोऱ्हे  sakal
पुणे

ज्योती देवरे प्रकरणाची महिला सचिवांकडून चौकशी व्हावी - नीलम गोऱ्हे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नगर (nagar) जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (jyoti deore) यांना होत असलेल्या त्रासाच्या घटनेची वरिष्ठ महिला सचिवांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही डॉ.गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

देवरे यांना होणाऱ्या त्रासातून त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याची क्‍लिप दोन दिवसांपुर्वी समाजमाध्यमांवर प्रसारीत झाली होती. या घटनेची डॉ.गोऱ्हे यांनी तत्काळ दखल घेत शुक्रवारी देवरे यांच्याशी संवाद साधला. तसेच देवरे यांच्या समस्येचे निवेदनही त्यांना प्राप्त झाले आहे. या निवेदनाच्या आधारे डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर निवेदन दिले आहे. त्यामध्ये संबंधीत प्रकरणाची वरिष्ठ महिला सचिवांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

डॉ.गोऱ्हे यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशीही संवाद साधला. त्यावेळी कुंटे यांनी देवरे यांच्यासंदर्भात विभागीय आयुक्त स्तरावरती चौकशी चालू असून महसूल विभागाच्या मार्फत देखील या घटनेबद्दल लक्ष घातले जात असल्याचे सांगितले. तर जिल्हाधिकारी भोसले यांनी या प्रकरणाची महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी सुरू असून सात दिवसात अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.

गोऱ्हे म्हणाल्या, ""लोकप्रतिनिधीची कामे होत असताना काही वेळा मतभेद होतात आणि काही वेळेला विशेष हक्कांचा प्रश्न देखील तयार होतो. दुसऱ्या बाजूला प्रशासनातील काही व्यक्ती महिला अधिकाऱ्यांवर किंवा इतरांवरही कुरघोडी करण्यासाठी अयोग्य गोष्टींचा वापर करताना दिसतात. या सगळ्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती समोर येईल. या दृष्टीकोनातून या चौकशीमधील तपशिलाची अपेक्षा असेल''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT