Kailas Cemetery case 11 people brun investigation underway by police municipal corporation avoid question pune  sakal
पुणे

कैलास स्मशानभूमी प्रकरण : पोलिसांनी मागविलेल्या माहितीवर महापलिकेची टोलवाटोलवी

कैलास स्मशानभूमी येथे अंत्यविधी करताना ११ नागरिक होरपळले असताना या घटनेचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कैलास स्मशानभूमी येथे अंत्यविधी करताना ११ नागरिक होरपळले असताना या घटनेचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी महापालिकेकडे अंत्यविधीसाठी ठेकेदारासाठी काही नियमावली आहे काम असे विचारले असता महापालिकेच्या विद्युत विभागाने थेट अशी नियमावली करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे धक्कादायक उत्तर दिले आहे. तसेच पोलिसांना हवी बहुतांश माहिती महापालिकेने दिलेली नसून, प्रश्‍नांची टोलवाटोलवी केली आहे.

पुणे महापालिकेच्या कैलास स्मशानभूमी येथे शेडमध्ये ४५ वर्षीय व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू असताना पेट्रोल टाकले जात होते. त्यावेळी त्याचा भडका उडून ११ जण भाजले. त्यात तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची सांगण्यात आले होते. ही घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाने ‘या घटनेचा आमचा काही संबंध नाही?’ अशी भूमिका घेत त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच स्मशानभूमीच्या कारभारात सुधारणा करण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. स्मशानभूमीचे कामकाज आरोग्य विभाग, विद्युत विभाग व संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून पाहिले जाते. पण या तिन्ही विभागात समन्वय नसल्याने त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. ही घटना घडल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवून या घटनेसंदर्भात तसेच महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार याची माहिती मागवली होती. त्याचे उत्तर विद्युत विभागाने आज (ता. ६) दिले आहे.

पोलिसांनी महापालिकेला अंत्यविधीच्या कामाच्या निविदेची माहिती मागवली होती, त्यावर विद्युत विभागाने अंत्यविधीसाठी निविदा काढलेली नाही, त्यामुळे याची प्रमाणित प्रत देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे उत्तर दिले आहे. अंत्यविधीबाबत ठेकेदारांसाठी नियमावली होती का? या प्रश्‍नावर, कोणतीही नियमावली करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही असे उत्तर विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी दिले आहे. कैलास स्मशानभूमीतील धुराच्या यंत्रणेची अधिकाऱ्यांकडून तपासणी होते का ?, यावर या यंत्रणेच्या दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी निविदा काढली जाते असे सांगण्यात आले आहे.

स्मशानभूमीत नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप काय याची माहिती द्यावी, त्यांचे नाव व संपर्क क्रमांक द्यावेत अशी मागणी पोलिसांनी केली असता यासाठी विद्युत विभागाने ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे बोट दाखविले असून, त्यांची नियुक्ती क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते, त्यांचे नाव व नंबरही त्यांच्याकडूनच घ्यावे असे उत्तर दिले आहे. विद्युत विभागाने केवळ ठेकेदाराकडून नियुक्त केलेल्या पाच कर्मचाऱ्यांचे नाव व नंबर पोलिसांना दिले आहेत.

कर्मचारी बंद मशिन चालू बंद करतात

चितेला अग्नी दिल्यानंतर लाकूड, गवऱ्या याचा धूर इतरत्र पसरू नये यासाठी धूर नियंत्रण मशिन चालू करणे व चिता शांत झाल्यानंतर बंद करणे हे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप आहे, असे उत्तर महापालिकेने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

Sonali Kulkarni:'सोनाली कुलकर्णीकडून सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे कौतुक'; समाज माध्यमात शेअर केला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT